जम्मू काश्मिर : Wushu International Championship : वुशू भगिनी अन्सा चिश्ती आणि आयरा चिश्ती यांनी 28 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत मॉस्को येथे होत असलेल्या रशियन मॉस्को स्टार्स वुशू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. आयराचं हं तिसरं आंतरराष्ट्रीय पदक आहे. यापूर्वी तिने जॉर्जियामध्ये सुवर्णपदक आणि इंडोनेशियातील जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं होतं. या दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदकं जिंकली आहेत.
रशियन प्रतिस्पर्ध्यांचा पराभव : वुशू भगिनी अन्सा चिश्ती आणि आयरा चिश्ती यांनी 28 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीत मॉस्को येथे झालेल्या रशियन मॉस्को स्टार्स वुशू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारताचं, विशेषत: जम्मू आणि काश्मीरला गौरव मिळवून दिला आहे अशी भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. या दोन्ही खेळाडूंनी आपापल्या 52 आणि 56 वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी अंतिम फेरीत त्यांच्या रशियन प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत चाहत्यांना तसंच जम्मू आणि काश्मीरच्या संपूर्ण क्रीडा समुदायाला आश्चर्य चकीत केलं. आयराचं हे तिसरं आंतरराष्ट्रीय पदक आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदकं जिंकली : यापूर्वी तिने जॉर्जियामध्ये सुवर्णपदक आणि इंडोनेशियातील जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं होतं. आता आंतरराष्ट्रीय वुशू चॅम्पियनशिपमधील तिचं हे सलग तिसरं पदक असून, गेल्या वर्षी राज्य पुरस्कारासाठीही तिची निवड झाली होती. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झालेली आयरा ही पहिली महिला वुशू खेळाडू आहे. तसंच, अन्साने आंतरराष्ट्रीय वुशू स्पर्धेत दुसरं पदक जिंकलं. यापूर्वी तिने जॉर्जिया आंतरराष्ट्रीय वुशू स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं होतं. आजच्या पदकासह त्याने आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील पहिलं सुवर्णपदक जिंकलं आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या वजन गटात राष्ट्रीय विजेते आहेत. तिने राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदकं जिंकली आहेत.
हेही वाचा :
1 हॉकीपटू केडी बाबू सिंह यांच्या घराचा होणार लिलाव; भारतासाठी जिंकली होती दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके
2 'किवी' होम पीचवर 8 वर्षानंतर 'कांगारुं'कडून पराभूत, भारतीय संघाला मिळाला फायदा!
3 बीसीसीआयकडून खेळाडूंचा वार्षिक करार जाहीर, श्रेयस अय्यरसह इशान किशनची काढली विकेट