जोहान्सबर्ग SA vs PAK 3rd T20I Live Streaming : दक्षिण अफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना आज 14 डिसेंबर (शनिवार) रोजी जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाईल. दक्षिण अफ्रिकेनं दुसऱ्या T20 सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता हा सामना जिंकत पाकिस्तानला 'क्लीन स्वीप' करण्याचा प्रयत्न असेल.
🟢🟡Match Day
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 14, 2024
It’s time for the final KFC T20 International Series match against Pakistan.🇿🇦vs🇵🇰
Our Proteas will look to make it a 3-0 clean sweep at the DP World Wanderers tonight!✨🏟️
Get your tickets at https://t.co/qMKjaITfWt!🎟️
📺Watch the action LIVE on SuperSport… pic.twitter.com/RZTTMuJHEO
दुसऱ्या T20 सामन्यात काय झालं : दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि सॅम अय्युबच्या शानदार खेळीमुळं 206/5 अशी भक्कम धावसंख्या उभारली. सॅमनं 57 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 98 धावा केल्या. त्याच्याशिवाय इरफान खाननं 16 चेंडूत 30 धावा जोडल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून दयान घालिअम आणि ओटनीएल बार्टमन यांनी 2-2 बळी घेतले. 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रीझा हेंड्रिक्सनं 117 धावांची स्फोटक खेळी केली. रॅसी व्हॅन डर ड्युसेन (66*) सोबतच्या त्याच्या भागीदारीनं दक्षिण आफ्रिकेला 19.3 षटकांत विजय मिळवून दिला.
🟢🟡Match Result
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 13, 2024
The Proteas take an unassailable 2-0 lead in the 3-match KFC T20i Series now.😎🏏
🇿🇦South Africa win by 7 wickets
Bring on the 3rd and final match tomorrow night at the DP World Wanderers Stadium!🏟️#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/wehev3AoNS
दक्षिण आफ्रिका क्लीन स्वीप करणार : दक्षिण अफ्रिकेनं पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत एकदाही तीन किंवा त्यापेक्षा अधिक T20 सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला क्लीन स्वीप केलेलं नाही. तसंच याआधी त्यांनी 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची T20 मालिका 2-1 नं जिंकली होती. यानंतर झालेल्या दोन मालिकेत पाकिस्ताननं विजय मिळवला आहे. त्यामुळं आजचा सामना जिंकत यजमान अफ्रिकन संघाला प्रथमच पाकिस्तानला तीन सामन्यांच्या T20 मालिकेत क्लीन स्वीप करण्याची संधी आहे.
मालिका | मालिकेतील सामने | जिंकले | हरले | मालिकेचा विजेता |
दक्षिण अफ्रिका विरुद्ध पाकिस्तान T20 सामना 2006/07 | 1 | 1 | 0 | दक्षिण अफ्रिका |
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका T20I मालिका (UAE मध्ये), 2010/11 | 2 | 2 | 0 | दक्षिण अफ्रिका |
दक्षिण अफ्रिका विरुद्ध पाकिस्तान T20I मालिका, 2012/13 | 1 | 0 | 1 | पाकिस्तान |
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका T20I मालिका (UAE मध्ये), 2013/14 | 2 | 2 | 0 | दक्षिण अफ्रिका |
दक्षिण अफ्रिका विरुद्ध पाकिस्तान T20I मालिका, 2013/14 | 2 | 1 | 1 | ड्रॉ |
दक्षिण अफ्रिका विरुद्ध पाकिस्तान T20I मालिका, 2018/19 | 3 | 2 | 1 | दक्षिण अफ्रिका |
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका T20I मालिका, 2020/21 | 3 | 1 | 2 | पाकिस्तान |
दक्षिण अफ्रिका विरुद्ध पाकिस्तान T20I मालिका, 2021 | 4 | 1 | 3 | पाकिस्तान |
दक्षिण अफ्रिका विरुद्ध पाकिस्तान T20I मालिका, 2024/25* | 2 | 2 | 0 | दक्षिण अफ्रिका |
दोन्ही संघातील हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 24 आंतरराष्ट्रीय T20 सामने झाले आहेत. त्यापैकी पाकिस्ताननं 12 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण अफ्रिकेनं 12 सामने जिंकले आहेत.
WHAT A PERFORMANCE!😃
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 13, 2024
Reeza Hendricks brings up his 1st T20i century for the Proteas in dominant fashion.🏏☄️
Incredible scenes and what a moment to celebrate!🥳#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/vYU4N4w5qO
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना : 10 डिसेंबर, डरबन (दक्षिण आफ्रिका 11 धावांनी विजयी)
- दुसरा T20 सामना : 13 डिसेंबर, सेंच्युरीयन (दक्षिण आफ्रिका 7 विकेटनं विजयी)
- तिसरा T20 सामना : आज, जोहान्सबर्ग
दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा T20 कधी होणार?
दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा T20 सामना आज शनिवार, 14 डिसेंबर रोजी वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग इथं भारतीय वेळेनुसार रात्री 9:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक अर्धा तास आधी होईल.
दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा पहिला T20 सामना कुठं आणि कसा पाहायचा?
दक्षिण अफ्रिका विरुद्ध पाकिस्तान T20 मालिका भारतातील टीव्हीवर स्पोर्ट्स 18-1 एसडी आणि स्पोर्ट्स 18-1 एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केली जाईल. तसंच जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
South Africa win the second T20I by seven wickets following Reeza Hendricks' century.#SAvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/4w8QbPzWjs
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 13, 2024
मालिकेसाठी दोन्ही संघ :
दक्षिण अफ्रिका : हेनरिक क्लासेन (कर्णधार/यष्टीरक्षक), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके (विकेटकीपर), डोनोव्हन फरेरा (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, पॅट्रिक क्रुगर, जॉर्ज लिंडे, क्वेना माफाका, डेव्हिड मिलर, एनरिक नॉर्टजे, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), तबरेझ शम्सी, अँडिले सिमेलेन, रासी व्हॅन डर ड्युसेन
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार/यष्टीरक्षक), अबरार अहमद, बाबर आझम, हारिस रौफ, जहाँदाद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान खान, ओमेर बिन युसूफ, सैम अयुब, सलमान अली आगा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मोकीम, तय्यब ताहिर, उस्मान खान (यष्टीरक्षक)
हेही वाचा :