मुंबई Team India Bowling Coach : भारतीय क्रिकेट संघाची पुढची मालिका सुरु होण्यास अजून वेळ आहे आणि सर्व खेळाडू ब्रेकवर आहेत किंवा काही देशांतर्गत टूर्नामेंटची तयारी करत आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील पुढील मालिकेपूर्वी विश्रांती घेत आहेत. दरम्यान, त्यांची एक मोठी मागणीही पूर्ण झाली आहे. गौतम गंभीरच्या मागणीवरुन भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलची (Morne Morkel) भारतीय क्रिकेट संघाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मॉर्केलनं याआधीही गंभीरसोबत आयपीएलमध्ये काम केलं आहे.
BREAKING:
— Cricbuzz (@cricbuzz) August 14, 2024
Morne Morkel appointed as the bowling coach of senior India men's team#BCCI #India #IndianCricketTeam pic.twitter.com/I6CqsmCrBX
कधीपासून स्विकारेल जबाबदारी : बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. मोर्ने मॉर्केल भारतीय क्रिकेट संघाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक असेल आणि 1 सप्टेंबरपासून तो आपली जबाबदारी स्वीकारेल. अशाप्रकारे तो भारत-बांगलादेश कसोटी मालिकेतील संघासोबत राहील. दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये जवळपास 550 बळी घेतलेल्या मॉर्केलनं यापूर्वी काही संघांसोबत गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे.
MORNE MORKEL - THE NEW BOWLING COACH OF INDIA. [Cricbuzz] pic.twitter.com/FQ14rTZP4n
— Johns. (@CricCrazyJohns) August 14, 2024
गंभीरचा सपोर्ट स्टाफ पूर्ण : भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी गौतम गंभीरनं बीसीसीआयसमोर आपल्या आवडीचा सपोर्ट स्टाफ मिळावा, अशी अट ठेवली होती. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर आणि शक्यतांनंतर अखेर त्याचा स्टाफ पूर्ण झाला आहे. याआधीही बोर्डानं नेदरलँडचा माजी फलंदाज रायन तेंडोशकाटे आणि माजी भारतीय फलंदाज अभिषेक नायर यांची सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. यानंतर हे प्रकरण फक्त गोलंदाजी प्रशिक्षकावरच अडकलं आणि गंभीरला या भूमिकेसाठी फक्त मॉर्केल हवा होता, ज्यासाठी सुरुवातीला बीसीसीआयला फारसा रस वाटला नाही. अखेर, गंभीरच्या सल्ल्यानुसार बोर्डानं दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाची नियुक्ती केली आहे.
यापूर्वी एकत्र केलं काम : मॉर्केलची निवड करण्यामागं गंभीरचा त्याच्यावर असलेला विश्वास हे कारण आहे. दोघांनी दीर्घकाळ एकत्र काम केलं आहे. गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असताना मॉर्केल त्याच्या संघात होता. यानंतर, जेव्हा गंभीर 2 वर्ष लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक होता, तेव्हा त्यानंच मॉर्केलला फ्रेंचायझीमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून आणलं. अशा स्थितीत गंभीरला भारतीय संघात आणण्याचा निर्णय आश्चर्यकारक नाही. तथापि, याआधी मॉर्केल पाकिस्तान क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक देखील होता आणि गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकादरम्यान तो त्या संघाशी संबंधित होता.
कशी आहे कारकिर्द : मॉर्केल दक्षिण आफ्रिकेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आणि या काळात त्यानं संघाच्या यशातही मोठा हातभार लावला. सुमारे साडेसहा फूट उंच असलेल्या या वेगवान गोलंदाजानं आपल्या देशासाठी 86 कसोटी सामन्यांमध्ये 309 विकेट घेतल्या. त्याचबरोबर 117 एकदिवसीय सामन्यांमध्ये 188 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्यानं 44 टी-20 सामन्यात 47 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं 2006 मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केलं आणि 2018 मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला.
हेही वाचा :