कानपूर Kanpur Test : भारतीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसननं क्रिकेटच्या दोन फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानं तत्काळ प्रभावानं T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले आहे. त्याचबरोबर कसोटी फॉर्मेटमधून कधी निवृत्ती घेणार हे देखील स्पष्ट केलं आहे.
SHAKIB AL HASAN WILL RETIRE FROM TESTS THIS YEAR...!!!
— Johns. (@CricCrazyJohns) September 26, 2024
- Shakib confirms his final Test will be against South Africa at Mirpur. [Abhishek Tripathi] pic.twitter.com/5uoLdHRJ7Q
शाकिब अल हसननं जाहीर केली निवृत्ती : कानपूर कसोटी सामन्यापूर्वी शाकिब अल हसननं पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान, शकीबनं जाहीर केलं की पुढील महिन्यात मीरपूर इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेच्या शेवटी त्यानं बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे (बीसीबी) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण जर शकीब अल हसनला त्या मालिकेत खेळण्यासाठी मंजुरी मिळाली नाही, तर कानपूर कसोटी सामना त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल.
काय म्हणाला शाकिब : शाकिब अल हसन म्हणाला, 'मी मिरपूरमध्ये माझी शेवटची कसोटी खेळण्याची इच्छा बीसीबीकडे व्यक्त केली आहे. मी हे बीसीबीला सांगितलं आहे, ते माझ्याशी सहमत आहेत. मी बांगलादेशला जावं यासाठी ते सर्व व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर असं झालं नाही तर, कानपूरमधील भारताविरुद्धचा सामना हा माझा कसोटी क्रिकेटमधील शेवटचा सामना असेल.' यासोबतच शाकिबनं T20 मधूनही निवृत्ती जाहीर केली आणि या सामन्यातील सर्वात लहान स्वरुपातील शेवटचा सामना खेळणार असल्याचं सांगितलं. तो 2024 मध्ये T20 विश्वचषक खेळला होता.
SHAKIB AL HASAN ANNOUNCES TEST RETIREMENT.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 26, 2024
- Shakib to retire from Test cricket after the Test match against South Africa in Mirpur. pic.twitter.com/g4DTAkxF9v
बांगलादेशच्या सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक : शाकिब अल हसनची गणना बांगलादेशच्या सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये केली जाते. त्याचबरोबर शाकिब जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. त्यानं बांगलादेशकडून आतापर्यंत 70 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत शाकिब अल हसननं 4600 धावा केल्या आहेत ज्यात 31 अर्धशतकं आणि 5 शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यानं या सामन्यांमध्ये 242 विकेट्सही घेतल्या आहेत. ज्यात 19 डावात 5 बळी घेण्याचा पराक्रमही आहे.
वनडे आणि T20 कारकिर्द कशी : जर आपण त्याच्या T20 आतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोललो तर त्यानं बांगलादेशसाठी एकूण 129 सामने खेळले. या सामन्यांमध्ये शाकिब अल हसननं 2551 धावा केल्या आणि 149 विकेट्सही घेतल्या. याशिवाय शाकिब अल हसननं बांगलादेशकडून 247 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. ज्यात त्याच्या नावावर 7570 धावा आणि 317 विकेट आहेत. मात्र त्यानं वनडे फॉरमॅटबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही. अशा परिस्थितीत तो या फॉरमॅटमध्ये खेळत राहू शकतो.
हेही वाचा :