ETV Bharat / sports

'जॉस' द 'बॉस'! बलटरच्या शतकापुढं कोहलीचं 'संथ' शतक व्यर्थ; राजस्थानच्या विजयाचा 'चौकार' - RR vs RCB - RR VS RCB

IPL 2024 RR vs RCB : आयपीएल 2024 च्या शनिवारी झालेल्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सहा गडी राखून पराभव केलाय. राजस्थान रॉयल्सच्या चालू हंगामात हा सलग चौथा विजय ठरलाय. या विजयासह राजस्थानं संघानं गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलंय.

Jos Buttler
'जॉस' द 'बॉस'! बलटरच्या शतकापुढं कोहलीचं 'संथ' शतक व्यर्थ; राजस्थानचा विजयाचा 'चौकार'
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 6:39 PM IST

Updated : Apr 7, 2024, 6:47 AM IST

जयपूर IPL 2024 RR vs RCB : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 19व्या सामन्यात राजस्थाननं रॉयल्स (RR) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चा सहा गडी राखून पराभव केलाय. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर शनिवारी झालेल्या या सामन्यात राजस्थानसमोर विजयासाठी 184 धावांचं लक्ष्य होतं, जे राजस्थाननं 20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पूर्ण केलं. यासह राजस्थान रॉयल्सनं चालू हंगामातील सलग चौथा विजय मिळवलाय. त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सला मागं टाकून गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलंय. तर आरसीबीचा हा पाच सामन्यांमधला चौथा पराभव ठरलाय.

बटलरनं झळकावलं शतक : राजस्थान रॉयल्सकडून सलामीवीर जॉस बटलरनं नाबाद 100 धावांची खेळी केली. बटलरनं 58 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकार मारलं. राजस्थानला विजयासाठी 1 धावांची गरज असताना जॉस बटलरनं कॅमेरुन ग्रीनच्या चेंडूवर षटकार ठोकून आपलं शतक पूर्ण केलं. जोस बटलरच्या शतकाच्या तुलनेत विराट कोहलीचं शतक फिकं पडलं. बटलरचं आयपीएल कारकिर्दीतील हे सहावं शतक होतं. बटलरशिवाय कर्णधार संजू सॅमसननंही 42 चेंडूंत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 69 धावांची तुफानी खेळी केली. सॅमसन आणि बटलरमध्ये दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी 148 धावांची भागीदारी झाली. आरसीबीकडून रीस टॉप्लीनं सर्वाधिक 2 बळी घेतले.

कोहलीनं या हंगामातील पहिलं शतक झळकावलं : तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसनं आरसीबीला चांगली सुरुवात करुन दिली. कोहली आणि डु प्लेसिसमध्ये 14 षटकांत 125 धावांची भागीदारी झाली. कोहलीनं रियान परागच्या चेंडूवर षटकार ठोकत 39 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर डुप्लेसिसनं 33 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं 44 धावा केल्या. डू प्लेसिसनंतर आरसीबीनं ग्लेन मॅक्सवेल आणि सौरव चौहान यांच्या विकेट स्वस्तात गमावल्या. मात्र या विकेट्सचा विराट कोहलीवर परिणाम झाला नाही आणि त्यानं शतक झळकावून आरसीबीला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेलं. कोहलीनं 72 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 113 धावा केल्या.

  • कोहलीचं आठवं शतक : आयपीएल 2024 मधील कोणत्याही फलंदाजाचं हे पहिलं शतक होतं. तर कोहलीचं आयपीएल कारकिर्दीतील हे आठवं शतक होतं. कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज आहे. या यादीत ख्रिस गेल आणि जॉस बटलर दुसऱ्या स्थानावर आहेत, ज्यांनी प्रत्येकी सहा शतकं झळकावली आहेत.

पुरुषांच्या टी-20 (आंतरराष्ट्रीय आणि डोमॅस्टिकक) मध्ये सर्वाधिक शतकं :

  • 22 - ख्रिस गेल
  • 11 - बाबर आझम
  • 9 - विराट कोहली
  • 8 - आरोन फिंच
  • 8 - मायकेल क्लिंगर
  • 8 - डेव्हिड वॉर्नर

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं :

  • 8 - विराट कोहली
  • 6 -ख्रिस गेल
  • 6 - जोस बटलर
  • 4 - केएल राहुल
  • 4 - डेव्हिड वॉर्नर
  • 4 - शेन वॉटसन

आयपीएलमधील सर्वोच्च शतकी भागीदारी (सलामी) :

  • 6 - डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन
  • 5 - डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो
  • 5 - विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस
  • 4 - मयंक अग्रवाल आणि केएल राहुल
  • 4 - ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉनवे
  • 4 - विराट कोहली आणि ख्रिस गेल

आयपीएलमधील सर्वोधीक शतकी भागीदाऱ्या (कोणत्याही विकेटसाठी) :

  • 10 - विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स
  • 9 - विराट कोहली आणि ख्रिस गेल
  • 6 - डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन
  • 6 - विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस

हेही वाचा :

  1. गतविजेत्या चेन्नईचा सलग दुसरा पराभव; तर घरच्या मैदानावर हैदराबादच्या विजयाचा 'अभिषेक' - SRH vs CSK
  2. पश्चातापाचं कारण बनलेला खेळाडूच 'प्रिती'च्या आनंदाचा ठरतोय कारण - Shashank Singh

Last Updated : Apr 7, 2024, 6:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.