पॅरिस Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय नेमबाज अवनी लेखारानं धमाकेदार कामगिरी केली आहे. अवनीनं शुक्रवारी (30 ऑगस्ट) महिलांच्या 10 मीटर एअर रायफल (SH1) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. अवनीनं पॅरालिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकलं. तर याच स्पर्धेत भारताच्या मोना अग्रवालनं कांस्यपदक जिंकलं. या दोन पदकांसह सध्या सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचं खातं उघडलं आहे. भारताकडे एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक आहे.
Indian Paralympian shooter Avani Lekhara wins gold medal in Women’s 10m air rifle at #ParisParalympics
— ANI (@ANI) August 30, 2024
Indian Paralympian shooter Mona Agarwal wins bronze medal. pic.twitter.com/cAKh1Tgo8C
अवनीचा पॅरालिम्पिक विक्रम : अवनीनं अंतिम फेरीत 249.7 गुण मिळवले, हा पॅरालिम्पिक विक्रम आहे. तर कांस्यपदक विजेत्या मोनानं 228.7 गुण मिळवले. अवनीनं टोकियो पॅरालिम्पिक (2020) मध्येही याच स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. म्हणजेच तिनं आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या ली युनरीनं रौप्यपदक पटकावलं. अवनीनं टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. अवनी लेखरा ही पात्रता फेरीत दुसरं स्थान मिळवून अंतिम फेरीत धडक मारण्यात यशस्वी ठरली. गेल्या वर्षभरापासून जबरदस्त फॉर्मात असलेली मोना अग्रवालही पाचव्या स्थानावर राहून आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. गतविजेत्या अवनीनं 625.8 गुण मिळवले आणि ती इरिना शेटनिकच्या मागे होती. इरिनानं पॅरालिम्पिक पात्रता फेरीत 627.5 गुणांसह नवा विक्रम प्रस्थापित केला.
SH1 श्रेणी म्हणजे काय : दोन वेळा विश्वचषक सुवर्णपदक विजेती मोनानं तिच्या पहिल्या पॅरालिम्पिकमध्ये 623.1 गुण मिळवले. अवनी तीन वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये SH1 प्रकारात सुवर्णपदक जिंकल्यानंतर देशातील सर्वाधिक प्रसिद्धी मिळवणारी पॅरा ॲथलीट बनली. कार अपघातात तिच्या खालच्या शरीराला गंभीर दुखापत झाल्यानंतर अवनी व्हीलचेअर वापरते. नेमबाजीमध्ये, SH1 श्रेणीमध्ये अशा नेमबाजांचा समावेश होतो, ज्यांनी त्यांच्या हातांच्या हालचालींवर, खालच्या धडावर, पायांवर परिणाम केला आहे किंवा त्यांच्या हाता-पायांनी ते दिव्यांग आहे.
हेही वाचा :