रावळपिंडी Pakistan vs Bangladesh Live : टी 20 विश्वचषक स्पर्धेत अपयशी ठरल्यानंतर दोन महिन्यांनी पाकिस्तानी संघ पुन्हा एकदा मैदानात उतरला आणि त्याचं पुनरागमन फारसं चांगलं झालं नाही. रावळपिंडीच्या मैदानात हिरवीगार खेळपट्टी करुन बांगलादेश संघाला वेगवान गोलंदाजांनी करु देण्याचा निर्णय पाकिस्तानवरच उलटला. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांची टॉप ऑर्डर सपशेल अपयशी ठरली. बाबर आझम आणि कर्णधार शान मसूदसारखे फलंदाज स्वस्तात बाद झाले. विशेषत: माजी कर्णधार बाबर आझमची अवस्था अशी होती की त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. (salman ali agha)
Pakistan - 16/3 vs Bangladesh.
— Johns. (@CricCrazyJohns) August 21, 2024
Sri Lanka - 6/3 vs England.
Bowlers are dominating Test cricket today...!!!! pic.twitter.com/CRPJy5qPjf
प्रथम फलंदाजी आणि डाव फसला : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना आज बुधवार 21 ऑगस्टपासून रावळपिंडी येथील पिंडी क्रिकेट स्टेडियमवर सुरु झाला. पाकिस्तानी संघ केवळ 4 वेगवान गोलंदाजांनी मैदानात उतरल्यामुळं आणि पिंडी मैदानाची हिरवीगार खेळपट्टीमुळं हा कसोटी सामना आधीच चर्चेत होता. सामन्याच्या दिवशी, ओल्या मैदानामुळं सामना उशिरा सुरु झाला, ज्यामुळं पाकिस्तानी चाहत्यांना अपेक्षा असेल की त्यांचा संघ प्रथम गोलंदाजी करेल आणि बांगलादेशला पटकन बाद कारेल, परंतु संपूर्ण झालं उलटंच पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी केली.
- Babar Azam duck.
— Johns. (@CricCrazyJohns) August 21, 2024
- Shan Masood six runs.
- Shafique two runs.
PAKISTAN 16 FOR 3 vs BANGLADESH...!!!!! pic.twitter.com/XWZBHVfQ7O
फक्त 2 चेंडूत खेळ खल्लास : बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली. विशेषत: संघातील सर्वात मोठा फलंदाज बाबर आझम वाईटरित्या बाद झाला. डावाच्या नवव्या षटकात डावखुरा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लामच्या लेगस्टंपवर चेंडू मारण्याच्या प्रयत्नात तो यष्टिरक्षकाच्या हातून झेलबाद झाला. आश्चर्याची बाब म्हणजे बाबर केवळ 2 चेंडूंचा सामना करु शकला आणि खातंही न उघडताच बाद झाला. परिणामी नवव्या षटकापर्यंत पाकिस्ताननं 3 विकेट गमावल्या. बाबर आझम कसोटी क्रिकेटमध्ये आठव्यांदा शून्यावर (शून्यवर आऊट) बाद झाला, पण याच गोष्टीनं त्याला सर्वात जास्त त्रास दिला.
पहिल्यांदाच घडलं असं : खरं तर बाबर कारकिर्दीत प्रथमच पाकिस्तानमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात खातं न उघडता बाद झाला. यापूर्वी 7 वेळा तो शून्यावर बाद झाला होता, त्या सर्व परदेशात घडल्या होत्या. तथापि, बाबर याआधी सलग 36 डावात खातं उघडण्यात यशस्वी ठरला होता आणि एप्रिल 2021 नंतर प्रथमच तो शून्यावर बाद झाला होता. दुसरीकडे बाबरच्या विकेटमुळं पाकिस्ताननं अवघ्या 16 धावांत 3 विकेट गमावल्या. संघाचा सलामीवीर अब्दुल्ला शफीक फक्त 2 धावा करु शकला आणि कर्णधार शान मसूदला फक्त 6 धावा करता आल्या.
हेही वाचा :