रावळपिंडी Pak vs Ban 2nd Test Live : बांगलादेश क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज लिटन दासनं पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात धमाकेदार शतक झळकावलं. रावळपिंडी इथं खेळल्या जात असलेल्या या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लिटननं संघाच्या पहिल्या डावात जबरदस्त शतक झळकावलं, ज्याच्या जोरावर बांगलादेशनं अवघ्या 26 धावांत 6 गडी गमावून दमदार पुनरागमन केलं आणि सामन्यात स्वतःला कायम ठेवलं. लिटनचं कसोटी कारकिर्दीतील हे चौथं शतक आहे, तर दुसऱ्यांदा त्यानं पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावलं आहे. यात लिटननं मेहदी हसन मिराजसोबत शतकी भागीदारीही केली. (pakistan national cricket team vs bangladesh national cricket team)
TAKE A BOW, LITON DAS...!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 1, 2024
- 138 (228) with 13 fours and 4 sixes, Bangladesh were 26/6 at one stage and under pressure to avoid the follow, but now they've scored 262/9. A knock to remember, one of the finest in history for Bangladesh. 👏⭐ pic.twitter.com/F39Kk0xEYo
शतक झळकावून संघाला वाचवलं : कसोटी मालिकेत 1-0 नं आघाडीवर असलेला बांगलादेशी संघ दुसऱ्या कसोटीत अडचणीत सापडला होता. पाकिस्तानप्रमाणेच पुन्हा एकदा त्यांची टॉप ऑर्डरही अपयशी ठरली आणि पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी दिवसाच्या पहिल्या सत्रातच 6 विकेट घेतल्या. खुर्रम शहजादनं 4 आणि मीर हमजानं 2 बळी घेत बांगलादेशच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. अशा स्थितीत सातव्या क्रमांकावर आलेल्या लिटन दासनं डावाची धुरा सांभाळली आणि शानदार शतक झळकावलं.
Liton Das and Mehidy Hasan Miraz - the heroes of Bangladesh. 🔥 pic.twitter.com/YdIg0FOc6D
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 1, 2024
पाकिस्तानविरुद्ध दुसरं शतक : लिटननं दिवसाच्या तिसऱ्या सत्रात 171 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. विशेष बाब म्हणजे लिटन शतकापासून 17 धावा दूर असताना बांगलादेशची आठवी विकेट पडली होती आणि दहाव्या क्रमांकाचा फलंदाज त्याच्यासोबत क्रिझवर होता. शिवाय चहाचा ब्रेकही झाला होता. तिसऱ्या सत्रात आलेल्या लिटननं तरीही जबाबदारी सांभाळली आणि जास्त वेळ न घेता आपलं शतक पूर्ण केलं. अबरार अहमदच्या चेंडूवर चौकार मारुन त्यानं चौथं कसोटी शतक पूर्ण केलं, तर पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्यांदा शतक पूर्ण केलं.
#PAKvsBAN pic.twitter.com/WLnhjLAIvB
— Rajabets 🇮🇳👑 (@smileagainraja) September 1, 2024
मेहदीसह सांभाळला डाव : लिटन दासनं दमदार शतक झळकावलं पण यादरम्यान त्याला मेहदी हसन मिराझचीही उत्तम साथ लाभली. 26 धावांत 6 विकेट पडल्या तेव्हा या दोन्ही फलंदाजांनी डावावर ताबा मिळवला. या दोघांनी आधी पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांच्या हल्ल्याचा सामना केला आणि नंतर आक्रमण करण्यास सुरुवात केली. मागील सामन्यातही दोन्ही फलंदाजांनी अप्रतिम अर्धशतकं झळकावून संघाला आघाडी मिळवून दिली होती आणि यावेळी त्यांनी सातव्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी करुन संघाला वाचवलं. सलग दुसऱ्या कसोटीत शतकाच्या जवळ आल्यावर मेहदी बाद झाला. मागच्या सामन्यात तो 77 धावांवर बाद झाला होता आणि यातही 78 धावांवर त्याची विकेट पडली.
पाकिस्तानची अवस्था खराब : लिटनच्या शतकाच्या बळावर बांगलादेशनं पहिल्या डावात पाकिस्तानच्या 274 धावांचा पाठलाग करताना सर्वबाद 262 धावांची मजल मारली. परिणामी पाकिस्तानला नाममात्र 12 धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यावर त्यांची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या डावात त्यांचे अवघ्या 9 धावांवर 2 विकेट गेल्या आहेत. त्यामुळं पाकिस्तानकडे आता 21 धावांची आघाडी झाली आहे. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत बांगलादेशचा संघ 1-0 नं पुढं आहे. आता हा दुसरा सामना जिंकत पाकिस्तानमध्ये पहिली मालिका जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
हेही वाचा :
- IPL मध्ये धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळलेल्या दिग्गजानं 4 वर्षांत तिसऱ्यांदा घेतली क्रिकेटमधून निवृत्ती - Legend Cricketer Retire
- विमानात प्रवास करताना तुटलेली सीट मिळाल्यानं भडकला दिग्गज क्रिकेटपटू; एअरलाइननं मागितली माफी - Jonty Rhodes LSG
- भारतीय संघासह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय सुरक्षा पाकिस्तानला जाणार? काय सांगतात नियम - ICC Champion Trophy