नवी दिल्ली Six Sixes in an Over : मंगळवारी, समोआच्या डॅरियस व्हिसरनं वनुआतुविरुद्ध खेळताना एका षटकात 39 धावा केल्या. तेव्हा आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यातील एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा नवा विक्रम रचला गेला. या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर व्हिसरनं भारताचा दिग्गज फलंदाज युवराज सिंगचा विक्रमही मोडीत काढला.
Deserves a better poster but I don’t know any photoshop lol.
— Anuradha (@Anuradhae90) August 20, 2024
What an innings by Darius Visser! pic.twitter.com/MfxRuZsAM0
एका षटकात 6 षटकार मारणारा टी 20 तील चौथा तर आतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सहावा फलंदाज : सामोआचा स्टार फलंदाज व्हिसेर 1 षटकात 6 षटकार मारणारा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी युवराज सिंग, किरॉन पोलार्ड आणि नेपाळच्या दीपेंद्र सिंग ऐरी यांनी टी 20 मध्ये तर दक्षिण आफ्रिकेच्या हर्षेल गिब्स आणि अमेरिकेच्या जसकरण म्हलोत्रा यानीही अशी कामगिरी केली आहे.
𝗦𝗮𝗺𝗼𝗮'𝘀 𝗗𝗮𝗿𝗶𝘂𝘀 𝗩𝗶𝘀𝘀𝗲𝗿 became the fourth batter to hit 𝘀𝗶𝘅 𝘀𝗶𝘅𝗲𝘀 in an over in T20Is and the sixth overall in international cricket.#𝗗𝗮𝗿𝗶𝘂𝘀𝗩𝗶𝘀𝘀𝗲𝗿 pic.twitter.com/DmPcDY9xOi
— CricTracker (@Cricketracker) August 20, 2024
डॅरियस व्हिसरनं केला नवा विश्वविक्रम : आयसीसी पुरुष टी 20 विश्वचषक उप-प्रादेशिक पूर्व आशिया-पॅसिफिक क्वालिफायर अ स्पर्धेसाठी सामोआ आणि वानुआतु आमनेसामने होते. यात व्हिसरनं शानदार शतक झळकावलं आणि 1 षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. या उजव्या हाताच्या फलंदाजानं अवघ्या 62 चेंडूत 132 धावा केल्या आणि 5 चौकार आणि 14 गगनचुंबी षटकार ठोकले.
Samoa's Darius Visser breaks Yuvraj Singh's record
— SportsTiger (@The_SportsTiger) August 20, 2024
📷: BCCI / ICC#dariusvisser #yuvrajsingh pic.twitter.com/fU5YzimQ2j
1 षटकात 39 धावा : समोआच्या डावाच्या 15व्या षटकात हा विक्रमी क्षण आला, ज्यात व्हिसरनं वानुआतुचा वेगवान गोलंदाज नलिन निपिकोला 1 षटकात 6 षटकार ठोकले. षटकात 3 नो-बॉल टाकल्यानं नवा विक्रम रचण्यात निपिकोच्या खराब गोलंदाजीचाही वाटा होता. व्हिसरनं सलग 3 षटकार मारुन षटकाची सुरुवात केली. षटकारांच्या हॅट्ट्रिकनंतर नो-बॉल होता. पुढच्या चेंडूवर पुन्हा षटकातील चौथा षटकार मारला गेला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर निपिकोनं डॉट बॉल टाकला. मात्र, पुढच्या चेंडूवरही तो नो-बॉल टाकत राहिला. यानंतर आणखी एक नो-बॉल आला आणि षटकातील पाचवा षटकार चेंडूवर लागला. यानंतर व्हिसरनं षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून एकूण 39 धावा केल्या आणि एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला.
युवराज सिंगचा विक्रम मोडला : 1 षटकात 6 षटकारांसह एकूण 39 धावा करुन, व्हिसरनं माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंगचा 1 षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला. 2007 साली युवराज सिंगनं इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध 6 चेंडूत 6 षटकार मारुन षटकात एकूण 36 धावा केल्या होत्या.
कधी आणि कोणाविरुद्ध मारले फलंदाजांनी सहा षटकार :
- हर्षेल गिब्स (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध नेदरलॅंड्स, 2007 (एकदिवसीय सामना)
दक्षिण आफ्रिकेचा माजी सुपरस्टार हर्षेल गिब्स हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज होता. एकूणच, गॅरी सोबर्स आणि रवी शास्त्री यांच्यानंतर तो तिसरा खेळाडू होता (या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये हे केलं). गिब्सनं हा कारनामा नेदरलँड्स विरुद्ध आयसीसी 2007 क्रिकेट विश्वचषकादरम्यान केला होता. त्यानं 40 चेंडूत 72 धावा केल्या, ज्यात सात षटकारांचा समावेश होता. त्यापैकी सहा षटकार डीएलएस व्हॅन बुंजविरुद्ध एका षटकात आले आणि दक्षिण आफ्रिकेनं तो सामना 221 धावांनी जिंकला.
- युवराज सिंग (भारत) विरुद्ध इंग्लंड 2007 (टी 20 सामना)
2007 च्या आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेत युवराज सिंगनं इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावलेली खेळी क्रिकेटचा खरा चाहता कधीही विसरु शकत नाही. त्यानं सर्वच इंग्लिश गोलंदाजांची धुलाई केली. पण स्टुअर्ट ब्रॉडनं डावाचं 19 वं षटक टाकलं युवराजनं या एकाच षटकात ब्रॉडला 6 षटकार मारुन 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. भारतानं 18 धावांनी विजय मिळवला आणि पुढं वाटचाल केली.
- किरॉन पोलार्ड (वेस्ट इंडिज) विरुद्ध श्रीलंका 2021 (टी 20 सामना)
किरॉन पोलार्ड, जो त्याच्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो, तो देखील या यादीत आहे. 2021 मध्ये कूलिज इथं श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी 20 सामन्यात त्यानं हा पराक्रम केला. वेस्ट इंडिजसमोर 132 धावांचं आव्हान होतं. पोलार्डनं अकिला धनजयाला एका षटकात सलग सहा षटकार मारुन इतिहास रचला आणि आतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. उल्लेखनीय म्हणजे, धनजयानं त्याच्या आधीच्या षटकात हॅट्ट्रिक घेतली, त्यामुळे हा सामना त्याच्यासाठी संमिश्र राहिला आणि वेस्ट इंडिजने तो आरामात जिंकला.
- जसकरण म्हलोत्रा (अमेरिका) विरुद्ध पापुआ न्यु गिनी 2021 (एकदिवसीय सामना)
भारतीय वंशाच्या जसकरण मल्होत्राच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये अमेरिकन फलंदाजाकडून सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम आहे. त्यानं 2021 मध्ये पापुआ न्यु गिनी (PNG) विरुद्ध 16 षटकार आणि चार चौकारांसह नाबाद 173 धावा केल्या. सामन्यादरम्यान, त्यानं PNG चा वेगवान गोलंदाज गौडी टोकाच्या एका षटकात सहा षटकार ठोकले. अमेरिकेनं तो सामना 134 धावांनी जिंकला आणि जसकरणनं त्याच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार जिंकला.
- दीपेंद्र सिंग आयरी (नोपाळ) विरुद्ध कतार 2024 (टी 20 सामना)
13 एप्रिल 2024 रोजी नेपाळचा हार्ड हिटिंग फलंदाज दीपेंद्र सिंग आयरी या एलिट यादीत सामील झाला. त्यानं ACC पुरुष प्रीमियर चषक सामन्यात कतारचा वेगवान गोलंदाज कामरान खानविरुद्ध अंतिम षटकात एका षटकात सहा षटकार ठोकले. त्यानं या सामन्यात 21 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या. नेपाळनं 210/7 अशी मजल मारली आणि 32 धावांनी सामना जिंकला.
हेही वाचा :