नवी दिल्ली Ishant Sharma Birthday : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आज वाढदिवस साजरा करत आहे. इशांत शर्मा आज 36 वर्षांचा झाला आहे. इशांत शर्मानं अनेक महत्त्वाच्या प्रसंगी भारतीय संघाला सामने जिंकवून दिले आहेत. पदार्पणाच्या सामन्यात त्यानं आपल्या गोलंदाजीनं रिकी पाँटिंगसारख्या फलंदाजांना खूप त्रास दिला.
लहाणपासून लांब केसांची आवड : भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा लांब केस आणि गोलंदाजी करताना विचित्र चेहरे करण्यासाठी प्रसिद्ध आहे. इशांत शर्माबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे की, शालेय जीवनापासूनच त्याला लांब केस ठेवण्याची आवड होती आणि त्यामुळं त्याला अनेकदा त्रासाला सामोरं जावं लागलं. इशांत शर्मानं स्वत: एका मुलाखतीत सांगितलं आहे की, लांब केस असल्यानं त्याच्या शाळेच्या उपमुख्याध्यापकांनी त्याला शिक्षा केली होती. "एकदा मी शाळेत असताना, मी अंडर-19 क्रिकेट खेळलो होतो, तेव्हा माझ्या उपमुख्याध्यापकांनी लांब केस असलेल्या विद्यार्थ्यांना पुढं येण्यास सांगितलं पण मी शांतपणे मागे उभा राहिलो. तेव्हाही माझी उंची सर्वात उंच होती." यानंतर त्यानं सांगितलं की, उपमुख्याध्यापकांनी माझे केस धरले आणि मला ओढलं. पण या सगळ्यानंतरही. मी माझे केस कापले नाहीत.
लांब केसांमुळं भरावा लागला दंड : इशांतनं भारताच्या अंडर-19 मालिकेदरम्यान घडलेल्या आणखी एका घटनेबद्दल सांगितले. दंडाची घटना सांगताना तो म्हणाला, लालू (लालचंद राजपूत) सर आमचे प्रशिक्षक होते. इशांत, तुला पुरेशी फॅशन आली आहे. तुम्ही इथं मॉडेल नाही, तुला तुझे केस कापावे लागतील. अन्यथा तुला $100 मॅच फी भरावी लागेल, असं त्यांनी म्हटल्याचं इशांतनं सांगितलं. तसंच प्रशिक्षकांनी कठोरपणे सांगितलं होतं की, कोणत्याही खेळाडूचे केस लांब नसावेत. त्यांनी खास मला केस कापायला सांगितले होते. एकदा मी केस कापायला सलूनमध्ये गेलो होतो पण सलून उघडलं नव्हतं. त्या वेळी मी इतका थकलो होतो की मी जाऊ शकलो नाही. मग मला दंड भरावा लागला. मी त्यांना दंड भरला, पण माझे केस कापले नाहीत.
कशी आहे कारकिर्द : इशांत शर्माच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यानं भारतासाठी 105 कसोटी, 80 एरदिवसीय आणि 14 टी 20 सामने खेळले आहेत. गोलंदाज म्हणून त्याच्या नावावर 434 विकेट्स आहेत. इशांतच्या नावावर कसोटीत 311, एकदिवसीय 115 आणि टी 20मध्ये 8 विकेट आहेत.
हेही वाचा :