अबूधाबी (युएई) IRE vs SA 2nd T20I Live Streaming : आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा T20 सामना आज म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकत मालिका जिंकण्याच्या निर्धारानं दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरेल तर दुसरीकडे हा सामना जिंकत मालिका बरोबरीत सोडवण्याचा आयर्लंड संघाचा प्रयत्न असेल.
WAITING FOR THE GAME?
— Cricket Ireland (@cricketireland) September 29, 2024
Why not read your FREE digital match programme - available right now.
In this edition you can read:
▪️ The two captains' messages
▪️ History between the two sides
▪️ Players to watch
▪️ A touching message from Simi Singh
➡️ Read here:… pic.twitter.com/CUhmZzbbte
पहिल्या T20 सामन्यात काय झालं : अबुधाबीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आयरिश संघानं 20 षटकांत 8 गडी गमावून 171 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 17.4 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठलं. दक्षिण आफ्रिकेकडून रायन रिकेल्टननं सर्वाधिक 76 धावांची खेळी खेळली. आपल्या स्फोटक खेळीदरम्यान रायन रिकेल्टननं 48 चेंडूत सहा षटकार आणि तीन चौकार ठोकले. रायन रिकेल्टनशिवाय रीझा हेंड्रिक्सनंही 51 धावा केल्या.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड : दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण सहा T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं सर्व सामने जिंकले आहेत. या मालिकेत आयर्लंडला पहिला विजय मिळवायचा आहे.
Match Results | 🟡🟢
— Proteas Men (@ProteasMenCSA) September 27, 2024
The Proteas win by 8 Wickets! 🏏🇿🇦🔥
Securing the first victory of the 2-part T20i series against Ireland. #WozaNawe #BePartOfIt #SAvsIRE pic.twitter.com/FwyF7jzuuQ
खेळपट्टी कशी असेल : अबुधाबीतील झायेद क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरते. विशेषत: सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना स्विंगची मदत मिळते. या मैदानावर गेल्या 10 टी-20 सामन्यांमध्ये सरासरी 128 धावा आहेत. जसजसा सामना पुढं जाईल तसतसं खेळपट्टीचं स्वरुप बदलू शकते. त्यामुळं टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो.
आयर्लंड वि दक्षिण आफ्रिका पूर्ण वेळापत्रक :
- पहिला T20 - 27 सप्टेंबर, दक्षिण आफ्रिका 8 विकेटनं विजयी
- दुसरा T20 - आज (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी)
- पहिला वनडे - 2 ऑक्टोबर (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी)
- दुसरा वनडे - 4 ऑक्टोबर (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी)
- तिसरा वनडे - 7 ऑक्टोबर (झायेद क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी)
Reeza Hendricks hits a massive milestone with 2000 T20I runs for the Proteas! 💥🔥
— Proteas Men (@ProteasMenCSA) September 27, 2024
💚💛 Here's to a journey of greatness and many more boundaries to come! 🇿🇦 #WozaNawe #BePartOfIt pic.twitter.com/I1M8lNrebo
- आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना कधी खेळला जाईल?
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना रविवार, 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.
- आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना कुठं खेळवला जाईल?
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना झायेद क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी इथं होणार आहे.
- आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना किती वाजता सुरु होईल?
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरु होईल.
Defeat in the first T20I in Abu Dhabi.
— Cricket Ireland (@cricketireland) September 27, 2024
▪️ Ireland 171-8 (20 overs)
▪️ South Africa 174-2 (17.4 overs)
SCORE: https://t.co/oWneg6ypNi
MATCH PROGRAMME: https://t.co/sKRI98drnm
WATCH: ROI/UK: TNT Sports 4
WATCH ELSEWHERE: https://t.co/btaULt2JvJ#IREvSA #BackingGreen pic.twitter.com/BiQohdhvod
- आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना भारतात टीव्हीवर दिसणार नाही.
- आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही फॅनकोड ॲपवर पाहू शकाल.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
आयर्लंड संघ : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, मॅथ्यू हम्फ्रीज, ग्रॅहम ह्यूम, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग.
दक्षिण आफ्रिका संघ : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनीएल बार्टमन, मॅथ्यू ब्रेत्झके, नांद्रे बर्गर, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, पॅट्रिक क्रुगर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, न्काबा पीटर, रायन रिकेल्टन, अँडिले सिमेलेन, सेंट ट्रायसन, एस. लिझाड विल्यम्स
हेही वाचा :