हैदराबाद IPL 2024 SRH vs LSG : पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद (SRH) नं इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात पुन्हा एकदा धमाकेदार विजय नोंदवलाय. यासह त्यांनी या सामन्यात विक्रमांचा पाऊस पाडलाय. हैदराबादनं बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) विरुद्ध खेळलेला सामना 10 गडी राखून एकतर्फी सामना जिंकलाय.
हैदराबादची आक्रमक फलंदाजी : लखनऊ संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैजराबादसमोर 166 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात हैदराबादनं एकही विकेट न गमावता केवळ 9.4 षटकांत विजय मिळवलाय. या विजयात सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा होते, ज्यांनी आक्रमक शैलीत अर्धशतक ठोकले.
बडोनी आणि पुरण यांनी सावरला लखनऊचा डाव : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघानं एकवेळ 66 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर आयुष बडोनी आणि निकोलस पुरन यांनी संघाची धुरा सांभाळली आणि सन्मान वाचवला. बडोनीनं 30 चेंडूत 55 धावांची दमदार नाबाद खेळी खेळली. तर पुरणनं 26 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. बडोनी आणि पूरण यांच्यात 5व्या विकेटसाठी 52 चेंडूत 99 धावांची नाबाद भागीदारी झाली. यामुळं लखनऊ संघानं 4 गडी गमावून 165 धावा केल्या. दुसरीकडे, हैदराबाद संघाकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं 2 आणि कर्णधार पॅट कमिन्सनं 1 बळी घेतला.
या सामन्यात अनेक मोठे विक्रम : हेड आणि अभिषेकच्या या शानदार खेळीनंतर विक्रमांची मालिका तयार झालीय. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या 10 षटकांत एवढी मोठी धावसंख्या झालीय. तसंच, लीगच्या इतिहासातील पॉवरप्लेमधील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
आयपीएल इतिहासातील पॉवरप्लेमधील सर्वोच्च धावसंख्या :
- 125/0 - हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 2024
- 107/0 - हैदराबाद वि लखनऊ, 2024
- 105/0 - कोलकाता विरुद्ध बेंगळुरु, 2017
- 100/2 - चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्ज, 2014
- 93/1 - पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता 2024
सर्वात कमी चेंडूत 100+ धावांची भागीदारी (IPL) :
- 30 बॉल - ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा विरुद्ध दिल्ली 2024
- 34 बॉल - ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा विरुद्ध लखनऊ 2024*
- 36 चेंडू - हरभजन सिंग आणि जे सुचिथ विरुद्ध पंजाब 2015
- 36 चेंडू - ख्रिस लिन आणि सुनील नरेन विरुद्ध बेंगळुरु 2017
IPL सामन्यातील पहिल्या 10 षटकातील सर्वोच्च धावसंख्या :
- 167/0 (9.4) - हैदराबाद वि लखनौ, 2024*
- 158/4 - हैदराबाद विरुद्ध दिल्ली, 2024
- 148/2 - हैदराबाद विरुद्ध मुंबई, 2024
- 141/2 - मुंबई विरुद्ध हैदराबाद, 2024
सर्वाधिक चेंडू शिल्लक असताना विजयाचा विक्रम :
- 62 चेंडू - हैदराबाद वि लखनौ, 2024 (लक्ष्य: 166)*
- 57 चेंडू - दिल्ली विरुद्ध पंजाब किंग्ज, 2022 (लक्ष्य: 116)
- 48 चेंडू - डेक्कन चार्जर्स विरुद्ध मुंबई, 2008 (लक्ष्य: 155)
हैदराबादचा लखनऊविरोधात पहिलाच विजय : लखनऊचा संघ 2022 च्या हंगामात आयपीएलमध्ये दाखल झाला. त्यांचा हा फक्त तिसरा सीझन आहे. अशा परिस्थितीत लखनऊ आणि हैदराबाद यांच्यात आतापर्यंत फक्त 3 सामने झाले होते. यात लखनऊ संघानं तिन्ही सामने जिंकले होते, मात्र हा सामना हैदराबादनं जिंकत लखनऊविरुद्ध पहिलाच विजय मिळवलाय.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
लखनऊ सुपर जायंट्स : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (यष्टिरक्षक /कर्णधार), मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, के गौतम आणि यश ठाकूर
इम्पॅक्ट खेळाडू : मणिमारन सिद्धार्थ, युद्धवीर सिंग, देवदत्त पडिक्कल, ॲश्टन टर्नर आणि अमित मिश्रा
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन
इम्पॅक्ट खेळाडू : मयंक अग्रवाल, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि उमरान मलिक
हेही वाचा :