बंगळुरु RCB vs SRH : इंडियन प्रीमियर लीगच्या ३०व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (RCB) होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना आरसीबीचे होम ग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे.
हेडचा नादच खुळा : या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेडने धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी पॉवरप्लेमध्येच ७१ धावा ठोकल्या. अभिषेक आणि हेडने पहिल्या विकेटसाठी अवघ्या ८ षटकात १०८ धावांची सलामी दिली. यावेळी हेडने अवघ्या २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सनरायझर्स हैदराबादनं इतिहास रचला आहे. हैदराबादनं पुन्हा एकदा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याचा विक्रम केलाय. आयपीएलच्या या मोसमात हैदराबादनं बंगळुरूचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला. आयपीएल २०१३ मध्ये आरसीबीनं २६३ धावा केल्या होत्या. हैदराबादने याच मोसमात मुंबईविरुद्ध खेळताना २७७ धावा केल्या होत्या. आता हैदराबादने स्वतःचाच विक्रम मोडला.