ETV Bharat / sports

आश्चर्यच...! 'हे' तीन भारतीय फलंदाज वनडे क्रिकेटमध्ये कधीही झाले नाही 'आउट'; एकाची तर झाली होती धोनीशी तुलना - Cricket Records - CRICKET RECORDS

3 Batsman Never Get Out in ODI : क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक महान फलंदाज झाले आहेत ज्यांनी धावा आणि शतकं झळकावली आहेत. परंतु, असे काही फलंदाज आहेत ज्यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील कोणताही गोलंदाज बाद करु शकला नाही.

3 Batsman Never Get Out in ODI
वनडे क्रिकेटमध्ये कधीही झाले नाही 'आउट' (AFP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 23, 2024, 1:08 PM IST

Updated : Aug 23, 2024, 7:32 PM IST

मुंबई 3 Batsman Never Get Out in ODI : क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक महान फलंदाज झाले आहेत ज्यांनी धावा आणि शतकं झळकावली आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का की असे काही फलंदाज आहेत ज्यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील कोणताही गोलंदाज आउट करु शकला नाही. अशाच काही भारतीय फलंदाजावर एक नजर टाकूया..

सौरभ तिवारी : सौरभ तिवारीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याला धोनीचा डुप्लिकेट म्हटलं जायचं. सौरभ तिवारीचे लांब केस पाहून लोक त्याची तुलना धोनीशी करायचे. सौरभ तिवारीनं आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवलं. सौरभ तिवारीनं 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सौरभ तिवारीनं भारतीय संघासाठी फक्त तीन एकदिवसीय सामने खेळले, ज्यात तो फक्त दोन डावांत फलंदाजी करु शकला. या दोन्ही डावात सौरभ तिवारी नाबाद राहिला. यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. सौरभ तिवारी व्यतिरिक्त असे दोन भारतीय फलंदाज आहेत ज्यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील कोणताही गोलंदाज बाद करू शकला नाही.

फैज फजल : फैज फजलनं देशांतर्गत क्रिकेटमधील आपल्या कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि त्यामुळंच त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली होती. परंतु या खेळाडूनं भारतीय संघासाठी केवळ एक वनडे सामना खेळला. 2016 मध्ये झालेल्या या एकदिवसीय सामन्यात फैज फझलनं झिम्बाब्वेविरुद्ध 55 धावांची नाबाद खेळी केली होती. या शानदार अर्धशतकानंतरही त्याला संघातून वगळण्यात आलं.

भरत रेड्डी : आजच्या क्रिकेट चाहत्यांना भरत रेड्डी हे नाव माहीत नसेल. पण या खेळाडूलाही भारताकडून केवळ तीन वनडे खेळण्याचं भाग्य लाभलं. भरत रेड्डीनं 1978 ते 1981 पर्यंत भारतासाठी तीन एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्याला दोनदा फलंदाजीची संधी मिळाली आणि दोन्ही वेळा तो नाबाद राहिला. यानंतर भारत रेड्डीलाही भारतीय संघातून वगळण्यात आलं आणि त्याच्या करिअरचाही अंत झाला.

हेही वाचा :

  1. भारतीय संघात वडिलांची कारकीर्द 13 दिवसांत संपली, नंतर सोडला देश; आता मुलगा इंग्लंडकडून मैदानात - Harry Singh
  2. आयसीसीला 5 वेळा बदलावं विश्वचषकाचं ठिकाण; पाकिस्तानकडूनही हिसकावलं होतं यजमानपद - ICC World Cup

Last Updated : Aug 23, 2024, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.