मुंबई India Announces Seven Man Squad : हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस टूर्नामेंटसाठी भारतीय क्रिकेट संघाची शनिवारी घोषणा करण्यात आली. ही स्पर्धा 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान हाँगकाँगच्या टिन क्वांग रोड रिक्रिएशन ग्राऊंडवर खेळवली जाईल. अनेक दिग्गज खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असून माजी स्फोटक फलंदाजाकडं या स्पर्धेसाठी भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे.
🚨SQUAD ANNOUNCEMENT🚨
— Cricket Hong Kong, China (@CricketHK) October 12, 2024
Here’s India’s Squad for the upcoming Hong Kong Sixes!
Look forward to an exciting tournament where The Men in Blue will showcase their amazing skills and lively energy!
Expect More Teams, More Sixes, More Excitement, and MAXIMUM THRILLS! 🔥🔥
HK6 is… pic.twitter.com/fdz3klixvC
भारतीय संघाचा कर्णधार कोण : हाँगकाँग क्रिकेट सिक्स टूर्नामेंटसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. या स्पर्धेसाठी स्फोटक फलंदाज रॉबिन उथप्पाला भारतीय संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा अनुभवी खेळाडू असलेल्या उथप्पानं आपल्या स्फोटक फलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणानं भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. T20 फॉरमॅटमध्ये त्याच्या चमकदार कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या उथप्पानं 2007 च्या T20 विश्वचषकात भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
🚨 TEAM INDIA FOR HONG KONG SIXES TOURNAMENT. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 12, 2024
Robin Uthappa (C), Jadhav, Manoj Tiwary, Nadeem, Goswami, Stuart Binny and Bharat Chipli. pic.twitter.com/xGp0dAHtIF
1992 मध्ये झाली हाँगकाँग सिक्सची सुरुवात : हाँगकाँग क्रिकेट सिक्स ही एक अनोखी, सिक्स-ए-साइड स्पर्धा आहे. जी 1992 मध्ये सुरु झाल्यापासून क्रिकेट जगतात एक प्रमुख आकर्षण आहे. उच्च-स्कोअरिंग सामने आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाणारी, ही वेगवान स्पर्धा दर्शक आणि थेट प्रेक्षक दोघांचंही मनोरंजन करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
सचिन आणि धोनीनंही घेतला आहे भाग : सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, शेन वॉर्न, वसीम अक्रम, शोएब मलिक, सनथ जयसूर्या, अनिल कुंबळे, उमर अकमल, ग्लेन मॅक्सवेल आणि डॅमियन मार्टिन यांसारख्या खेळाडूंनी या स्पर्धेत आपली ताकद दाखवली असून, पाकिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या स्पर्धेत हे यशस्वी संघ आहेत.
भारतीय संघ :
रॉबिन उथप्पा (कर्णधार), केदार जाधव, मनोज तिवारी, शाहबाज नदीम, भरत चिपली, श्रीवत्स गोस्वामी, स्टुअर्ट बिन्नी
हेही वाचा :