नवी दिल्ली Scotland vs Australia Hilarious Trophy : मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. पण, इंग्लंडला जाण्यापूर्वी त्यांनी स्कॉटलॅंडचा दौरा केला होता. जे ऑस्ट्रेलियापासून 15 हजार 182 किमी दूर आहे. ऑस्ट्रेलियन संघ इथं 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेला होता. ऑस्ट्रेलियानं सप्टेंबरमध्ये या दौऱ्यावर 3-0 नं मालिका जिंकली होती. पण त्यानंतर त्याच्या कर्णधाराला चषक नाही तर 'कटोरा' देण्यात आला.
Trophy Time! 🏆
— OneCricket (@OneCricketApp) September 7, 2024
Mitchell Marsh and his squad pose with the Trophy after T20I series Whitewash.#SCOvAUS pic.twitter.com/YgSfeukaJH
विजयानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधाराला मिळाला 'कटोरा' : क्रिकेटमध्येही विजयी संघ किंवा त्याच्या खेळाडूंबाबत विचित्र गोष्टी घडल्या आहेत. स्कॉटलंडमध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडे सोपवण्यात आलेला 'कटोरा'ही त्यापैकीच एक आहे. बरं, जर तुम्ही या 'कटोऱ्या'ला एक सामान्य भांडं मानण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. या 'कटोऱ्या'ला स्वतःचं एक महत्त्व आहे.
They encountered fog, embraced fans wandering along the boundary and came away with possibly the world's smallest series trophy. Australia's first bilateral series in Scotland was certainly unique #SCOvAUS | @jackpayn
— cricket.com.au (@cricketcomau) September 8, 2024
More: https://t.co/5lU6etGfO9 pic.twitter.com/ouosbpvAHu
'कटोऱ्या'चं स्वतःचं महत्त्व : स्कॉटलंडविरुद्ध टी 20 मालिका जिंकल्यानंतर प्रजेन्टरनं ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शकडे जो 'कटोरा' दिला त्याला स्कॉटिश स्मृती चिन्ह म्हणतात. ज्याचा वापर व्हिस्की ठेवण्यासाठी केला जातो. स्कॉटलंडचं राष्ट्रीय पेय व्हिस्की या 'कटोऱ्या'त ओतलं गेलं आणि सर्व खेळाडूंनी प्रत्येकी एक घोट प्याला. या स्कॉटिश परंपरेला अनुसरुन ऑस्ट्रेलियन संघानंही 'कटोऱ्या'सोबत ग्रुप फोटोसाठी पोज दिली. संघ ट्रॉफींबाबत नेमके हेच करतात.
Is this the smallest cricket series/tournament trophy ever? #SCOvAUS https://t.co/QAiYgApzmm
— Anshul Gupta (@oyegupta_) September 8, 2024
इंग्लंडमध्ये 3 टी 20 आणि 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका : स्कॉटलंडमध्ये टी 20 मालिका जिंकून पारंपारिक चषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडला रवाना झाला. ऑस्ट्रेलियाला इंग्लंडमध्ये 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळायची आहे, जी 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाईल. तसंच 15 सप्टेंबरपासून उभय संघांमध्ये 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. ही एकदिवसीय मालिका 29 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
हेही वाचा :