मेलबर्न Pat Cummins on Break : पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. ज्यानं 2023 मध्ये भारताकडून दोन आयसीसी ट्रॉफी हिसकावून घेतल्या. मात्र आता पुन्हा एकदा महामुकाबला जवळ आल्यावर पॅट कमिन्सनं क्रिकेटपासून दूर राहण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याच्या या निर्णयानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकलं होतं.
Pat Cummins has taken a 2 month hiatus from cricket to rejuvenate himself for the Border Gavaskar Trophy. pic.twitter.com/UX0YvoDc72
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 18, 2024
पॅट कमिन्सनं हा घेतला निर्णय : गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपासून पॅट कमिन्स खूप व्यस्त वेळापत्रकातून गेला आहे. एकदिवसीय विश्वचषक, आयपीएल 2024, टी 20 विश्वचषक यासह कोणतीही स्पर्धा त्यानं गमावली नाही. आता थकवा आणि कामाच्या ताणामुळं पॅट कमिन्सनं सुमारे 8 आठवड्यांचा ब्रेक घेतला आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपर्यंत फ्रेश होण्यासाठी त्यानं हा निर्णय घेतला आहे. पॅट कमिन्स भारत-ऑस्ट्रेलिया मालिका जिंकण्यासाठी आतुर आहे. 2014-15 पासून ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्ध मायदेशात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. 2018-19 आणि 2020-21 मध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करुन इतिहास रचला होता. मात्र यावेळी पॅट कमिन्स पूर्ण तयारीनिशी सामन्यांसाठी सज्ज होत आहे. 22 नोव्हेंबरपासून उभय संघांमधील कसोटी मालिका सुरु होणार असून, ही कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
Pat Cummins said " it's the trophy i haven't won before, this is the one trophy a lot of our group haven't ticked off, india is a really good side". [fox cricket - talking about bgt] pic.twitter.com/QWZWorNI3F
— Johns. (@CricCrazyJohns) August 18, 2024
काय म्हणाला पॅट कमिन्स : फॉक्स क्रिकेटशी बोलताना पॅट कमिन्स म्हणाला, 'ही अशी ट्रॉफी आहे जी मी कधीही जिंकलेली नाही. खरं तर आमच्या संघातील अनेक खेळाडूंना विजय मिळवता आलेला नाही. संघ म्हणून आम्ही काही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मायदेशात मालिका जिंकण्यासाठी तुमचा स्वतःवर विश्वास आहे. मायदेशात मालिका जिंकण्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. 18 महिन्यांपूर्वी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापासून मी सतत गोलंदाजी करत आहे. या ब्रेकमुळं मला 7 किंवा 8 आठवडे गोलंदाजीपासून पूर्णपणे दूर राहण्याची संधी मिळेल, जेणेकरुन शरीर तंदुरुस्त होईल आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा तयारी सुरु करु शकाल.
हेही वाचा :