तेलंगाना Ugadi 2024 : "उगादी" (Ugadi Festival) हा तेलुगू सण आहे. जो संपूर्ण दक्षिण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला येतो. दक्षिण भारतात तो हिंदू नववर्षाच्या आगमनानिमित्त साजरा केला जातो. हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावानं साजरा केला जातो.
या नावानं साजरा होतो उत्सव : कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कोकणी समाजातील लोक याला युगाडी, तामिळनाडूमध्ये उगादी, महाराष्ट्रात गुढी पाडवा, गोव्यात संवत्सर पाडवा, राजस्थानमध्ये थापना, काश्मीरमध्ये नवरेह, मणिपूरमध्ये साजिबू नोंगमा पंबा किंवा मेईतेई म्हणतात. संस्कृतमध्ये याचा अर्थ एका नव्या युगाची सुरुवात असा होतो. मान्यतेनुसार ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली. हा सण भारतभर आपापल्या परंपरेनुसार आणि चालीरीतींनुसार साजरा केला जातो. या दिवसापासून उत्तर भारतात चैत्र नवरात्रीचा उत्सव सुरू होतो.
शुभ मुहूर्त : उगादीसाठी शुभ मुहूर्त हा 8 एप्रिल 2024 रोजी रात्री 11:50 वाजता सुरू होईल आणि 9 एप्रिल 2024 रोजी रात्री 8:30 वाजता संपणार आहे.
पूजा पद्धत : सकाळी आंघोळ झाल्यावर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि अंगणावर (असल्यास) शेणाचा लेप करून रांगोळी काढली जाते. यानिमित्तानं केळीच्या पानांनी आणि फुलांनी गृहमंदिराची सजावट केली जाते. यानंतर, घरातील सर्व सदस्य एकत्रितपणे त्यांच्या प्रमुख देवतेची पूजा करतात आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. पूजेनंतर, प्रत्येकजण एकमेकांना उगादीच्या शुभेच्छा देतात. प्रत्येकजण या दिवशी खास तयार केलेल्या पारंपारिक अन्नाचा आनंद घेतो.
उगादी उत्सवाचा इतिहास : उगादी हा हिंदूंसाठी नेहमीच महत्त्वाचा ऐतिहासिक सण राहिला आहे. या दिवशी श्रीमंत आणि मध्यमवर्गीयांकडून मंदिरांना अनेक देणग्या दिल्या जातात. पौराणिक कथेनुसार, या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाच्या निर्मितीची सुरुवात केली. काळाचा मागोवा घेण्यासाठी वर्षे, महिने, आठवडे आणि दिवसांचा परिचय करून त्यांनी या महत्त्वपूर्ण कार्याला सुरुवात केली. म्हणूनच उगादीला नवीन युगाच्या प्रारंभाचा दिवस असेही म्हणतात. हिंदू ग्रंथांनुसार, युगादिकृत, भगवान विष्णूच्या अनेक नावांपैकी एक, युग किंवा युगांची निर्माती होते. अशाप्रकारे, तेलगू आणि कन्नडिगा लोक भगवान विष्णूचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्या जीवनात आनंद, समृद्धीसाठी प्रार्थना करतात.
हेही वाचा -