सातारा Ramdas Athawale On Rahul Gandhi : भाजपा काँग्रेस फोडत आहे. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी (Rahul Gandhi) हे 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) काढत आहेत. त्यांनी अगोदर आपला पक्ष सावरावा, असा खोचक सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिला. दरम्यान, लोकसभेला महायुतीनं रिपाइंला महाराष्ट्रात किमान दोन तरी जागा द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केलीय.
महाराष्ट्रात रिपाइंला दोन जागा द्याव्यात : सातारा दौऱ्यावर आलेले रामदास आठवलेंनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, संविधान बदलणार असल्याच्या चुकीच्या अफवा काँग्रेसकडून परसवल्या जात आहेत. संविधानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा पंडित नेहरु यांचे योगदान मोठं आहे, असं एका काँग्रेसच्या नेत्यानं ट्विट केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप आठवलेंनी यांनी यावेळी केला.
राहुल गांधींनी पक्ष सावरावा : राहुल गांधी हे 'भारत जोडो यात्रा' काढत आहेत. परंतु ते भारत जोडण्या ऐवजी तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आधी आपला पक्ष सावरण्यावा, अशी खोचक टीका आठवले यांनी केली. रिपाइंमुळंच भाजपा-शिवसेनेची युती झाली आहे. आमची युती आजची नाही. भाजपासोबत मोठे पक्ष असल्यानं रिपाईचं नाव मागे पडलं आहे. परंतु रिपाइंचा मतदार हा प्रामाणिक मतदार आहे. मी घेतलेली भूमिका देशातील रिपाइंचा कार्यकर्ता आचरणात आणतो, असंही आठवले म्हणाले.
कॉंग्रेस करणार आहे केवळ चाळीशी पार : आमचा पक्ष संपूर्ण देशात आहे. त्यामुळं महाराष्ट्रात दोन जागा आम्हाला दिल्या गेल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केलीय. 'महाराष्ट्रात 45 आणि देशात 400 पार, काँग्रेस करणार आहे केवळ चाळीशी पार', अशी शीघ्र कविताही आठवलेंनी केलीय.
हेही वाचा -