ETV Bharat / politics

"आमची बायको हिरोईन नाही म्हणून..."; फहाद अहमदच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसनं अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या फहाद अहमद यांना उमेदवारी दिली. ते अभिनेत्री स्वरा भास्करचे पती आहेत.

Sharad Pawar And Fahad Ahmad
शरद पवार आणि फहाद अहमद (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2024, 8:04 PM IST

Updated : Oct 27, 2024, 9:00 PM IST

मुंबई : अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं समाजवादी पक्षातून आलेल्या फहाद अहमद यांना उमेदवारी (Swara Bhasker Husband Fahad Ahmad) दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. "उपऱ्यांना पक्षात आल्यावर लगेच उमेदवारी मिळत असेल तर, आम्ही इतकी वर्षे निष्ठेनं पक्षाचं काम करुन काय फायदा?" असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे प्रदेश सचिव निलेश भोसले पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. "आमच्या इच्छुक उमेदवारांपैकी कुणाचीही पत्नी हिरोईन नसल्यानं आम्हाला उमेदवारी मिळाली नाही," असा टोला भोसले यांनी लगावला. फहाद अहमद यांची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर आहे.

अर्ध्या तासापूर्वी आलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी : "अणुशक्तीनगर भागातील कार्यकर्ते पक्षाच्या कठीण काळात पूर्णपणे पक्षाच्या पाठीशी उभे राहिले. मात्र, जेव्हा उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा समाजवादी पक्षातून अर्ध्या तासापूर्वी आलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. तर पक्षाचा हा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांना आवडलेला नाही. याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे," अशी माहिती निलेश भोसले यांनी दिली.

स्वरा भास्करनं मानले आभार : फहाद अहमद यांच्या राष्ट्रवादी (SP) प्रवेशाबद्दल तसंच उमेदवारी दिल्याबद्दल त्यांची पत्नी अभिनेत्री स्वरा भास्करनं शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अखिलेश यादव आणि अबू आझमी यांचे आभार मानले आहेत.

सना मलिक विरुद्ध फहाद अहमद : अणुशक्तीनगर मतदारसंघात नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक विरोधात फहाद अहमद अशी लढत रंगणार आहे. अणुशक्तीनगर मतदारसंघातून विद्यमान आमदार नवाब मलिक यांच्याऐवजी त्यांची मुलगी सना मलिक यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसनं उमेदवारी दिली. नवाब मलिक या मतदारसंघातून २००९ आणि २०१९ असे दोन वेळा विजयी झाले होते. या निवडणुकीत ते अणुशक्तीनगर ऐवजी शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

फहाद अहमद यांनी मानले आभार : महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळवण्यासाठी समाजवादी पक्ष अणुशक्तीनगर मतदारसंघासाठी आग्रही होता. मात्र, आता थेट त्यांचा संभाव्य उमेदवार राष्ट्रवादीत (SP) आल्यानं राष्ट्रवादीनं फहाद अहमद यांना उमेदवारी दिली. त्यामुळं या मतदारसंघातून सना मलिक विरुद्ध फहाद अहमद असा सामना रंगणार आहे. पक्षप्रवेश आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फहाद अहमद यांनी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची विचारधारा समान असल्याचं मत व्यक्त केलं. शरद पवारांनी अखिलेश यादव यांच्याशी संवाद साधून आपल्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

हेही वाचा -

  1. EXCLUSIVE : पालघरमधून राजेंद्र गावित यांची उमेदवारी निश्चित, सहा महिन्यांतच पुन्हा घरवापसी
  2. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर; 'या' अभिनेत्रीच्या पतीला उमेदवारी
  3. अर्ध्या तासात गुंड जमा, सुजय विखेंवरील प्राणघातक हल्लाचा मास्टमाईंड कोण? राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल

Last Updated : Oct 27, 2024, 9:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.