नाशिक Raj Thackeray Nashik Visit : आगामी लाेकसभा निवडणुकीच्या (lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे १ आणि २ तारखेला नाशिक दाैऱ्यावर येत आहेत. या दाैऱ्यात ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतानाच त्यांनी सुरू केलेल्या राजदूत ‘शाखा नव्हे नाका’ या अभियानाचा आढावा घेणार आहेत.
असा असणार दौरा : 1 तारखेला सकाळी 11 वाजता राज ठाकरे यांचं आगमन होणार आहे. ते सुरूवातीला शाखाध्यक्ष शहर कार्यकारणी, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्षांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ग्रामीण पदाधिकाऱ्यांचे शिबिर होणार आहे. तसंच काही शहर आणि ग्रामीण भागातील पक्ष प्रवेश होणार आहेत. दुसऱ्या दिवशी 2 तारखेला सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदेनंतर ते मुख्याध्यापक आणि शिक्षकांसह आध्यात्मिक आघाडीशी चर्चा करणार आहेत. संत निवृत्तीनाथ महाराज शिष्टमंडळही राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्याचबरोबर सुवर्णकार समितीतील सदस्य आणि महिला पदाधिकाऱ्यांशी ते विविध विषयांवर चर्चा करणार आहेत.
नरेंद्र मोदींनी केला होता नाशिकचा दौरा : राज ठाकरेही नाशिकच्या राजकारणावर चर्चा करणार असल्यानं, त्यांच्या या नाशिक दौऱ्याकडं सर्वांचं लक्ष लागलं. भाजपा पाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी, अजित पवार, शरद पवार गट आणि शिवसेना यांनीही लोकसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२ जानेवारी रोजी नाशिकचा दौरा करीत भाजपाच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही २२ आणि २३ जानेवारी असे दोन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकत लोकसभेचा नारळ फोडला होता. त्यापाठोपाठ आता राज ठाकरेही नाशिकमध्ये दोन दिवस आहेत.
हेही वाचा -