मुंबई Maha Vikas Aghadi Seat Sharing : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
मुंबईत 36 पैकी 20 जागा शिवसेनेला : मुंबईत झालेल्या महाविकास आघाडी आजच्या बैठकीत मुंबईतील विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) जागा वाटपात मोठा भाऊ असणार आहे. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 जागा शिवसेनेला द्याव्यात, अशी मागणी ठाकरे गटानं केल्याची माहिती आहे. तर अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. वांद्रे पूर्व जागेसाठी ठाकरे गट आग्रही आहे. या जागेसाठी वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्याचा ठाकरे गटाचा विचार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार) रवींद्र पवार यांना अणुशक्ती नगर या जागेवर उमेदवारी दिली जाईल, असं मानलं जात आहे. काँग्रेसनं चांदवलीच्या जागेची मागणी केली आहे. या जागेवर काँग्रेस नेते नसीम खान यांना उमेदवारी देणार आहे.
मुंबईत शिवसेना मोठा भाऊ : मुंबईतील विधानसभा जागांच्या संदर्भात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी "मुंबईत शिवसेना हा मोठा भाऊ आहे आणि राहीलं, लोकसभा निवडणुकीच्यावेळी देखील शिवसेनाच मोठा भाऊ होता," अशी प्रतिक्रिया दिली.
कुणाला किती जागा? : मुंबईत 36 पैकी 20 जागांची मागणी ठाकरे गटानं केली आहे. तर 7 जागांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानं केली आहे. त्यामुळे उर्वरित 9 जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय झाला नसल्यानं पुढील बैठकीत जागावाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
- आदित्य ठाकरेंच्या विरोधातही देणार उमेदवार; अत्याचार अगोदरही होते, निवडणूक आल्यानं विरोधक सरकारला बदनाम करताय का ?, राज ठाकरेंचा हल्लाबोल - Raj Thackeray Slams MVA Leaders
- राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडी आक्रमक; शरद पवार, सुप्रिया सुळेंचं भरपावसात आंदोलन, उद्धव ठाकरेंचं मुंबईत आंदोलन - MVA Protest In Maharashtra
- आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; कोर्टाला देखील लेकीबाळी आहेत हे लक्षात घ्या, संजय राऊत यांची न्यायालयावर आगपाखड - Sanjay Raut On MVA Protest