ETV Bharat / politics

महायुतीतील अंतर्गत लढाई, ठाकरे गटाची महिलेला उमेदवारी; मुख्यमंत्र्यांच्या पुत्राला लोकसभेचा यंदा 'अवघड पेपर' - Kalyan Lok Sabha Constituency - KALYAN LOK SABHA CONSTITUENCY

Kalyan Lok Sabha Constituency : एकीकडं राज्यात शिवसेना-भाजप युती असली, तरी कल्याण लोकसभेत वेगळे चित्र आहे. महायुतीत नाराजी आहे. दुसरीकडं शिवसेना ठाकरे गटानं या मतदारसंघात महिलेला उमेदवारी दिल्यानं खासदार श्रीकांत शिंदेंपुढे ही निवडणूक आव्हानात्मक असल्याचं बोललं जातंय.

Shrikant Shinde
महायुतीतल अंतर्गत लढाई, ठाकरे गटाची महिलेला उमेदवारी; मुख्यमंत्र्यांच्या पुत्राला कल्याण लोकसभेचा यंदा अवघड पेपर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 5, 2024, 10:15 AM IST

ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर

ठाणे Kalyan Lok Sabha Constituency : कल्याण लोकसभा मतदारसंघातील बरेचसे आमदार आणि महायुतीमधील स्थानिक पदाधिकारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर नाराज असल्याचं चित्र मतदारसंघात पाहायला मिळतंय. या अंतर्गत नाराजीचा फटका श्रीकांत शिंदे यांना बसू शकतो. त्यातच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं या मतदारसंघात महिला उमेदवार जाहीर केलाय.

श्रीकांत शिंदे यांनी प्रचार सुरु केल्याचं माध्यमांना सांगितले. मात्र याचसंदर्भात उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी थेट प्रचाराला सुरुवात केली. श्रीकांत शिंदे हे कमळावर लढणार की धनुष्याबाणावर लढणार, हे आधी त्यांना पक्क करायला सांगा, असं वैशाली दरेकर यांनी म्हटलं. विजयाची हॅट्रिक होईल, असं ते म्हणत आहेत. हॅट्रिक सोडाच त्यांच्या गटातील सात जणांच्या भाजपानं विकेट काढल्या आहेत. हे आठवे ठरले नाहीत म्हणजे मिळवलं असं वक्तव्य दरेकर यांनी केलं. त्यामुळे एकीकडे महायुतीमधील अंतर्गत नाराजी, अन दुसरीकडे ठाकरे गटाच्या महिला उमेदवारामुळं खासदार श्रीकांत शिंदेंपुढे ही निवडणूक आव्हानात्मक असल्याचं बोललं जातंय.

लोकसभेत भाजपाची ताकद : कल्याण लोकसभा मतदार संघात 6 विधानसभा येतात. यात गणपत गायकवाड कल्याण पूर्व, रवींद्र चव्हाण डोंबिवली तर कुमार अयलानी उल्हासनगर असे तीन भाजपाचे आमदार आहेत. तर राजू पाटील कल्याण ग्रामीण मधून मनसेचे तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे कळवा मुंब्राचे आहेत. तसंच शिवसेना शिंदे गटाचे एकमेव आमदार डॉ. बालाजी किणीकर हे अंबरनाथमधून आमदार आहेत. एकंदरीतच या मतदार संघात भाजपाची सर्वाधिक राजकीय ताकद आहे. त्यामुळे भाजपानंही या मतदार संघावर दावा केला. गेल्या काही महिन्यांपासून भाजपा-शिंदे गटात सुरू असलेल्या वादाचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला फायदा होणार असल्याचं दिसून येतंय. त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांची खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कल्याण ग्रामीणमधील नागरी विकास कामांवरुन श्रेयवादाची लढाई आजही सुरू असल्याचं दिसून येतंय.

मनसेचे राजू पाटील आणि श्रीकांत शिंदेंमध्ये वाकयुद्ध : गेल्याच वर्षी मनसेचे आमदार राजू पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलंय होत. गेल्या वाढदिवशी आमदार राजू पाटील यांना भावी खासदार लिहिलेला केक कापला. इतकंच नाही तर साहेबांनी आदेश दिल्यास आपण कल्याण लोकसभा लढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. तर खासदार श्रीकांत शिंदे यांनीही राजू पाटलांच्या आव्हानाला उत्तर देताना आजीच्या पुढे माजी लागायला नको याची काळजी घ्या, असा टोला लगावला होता. त्यावर आमदार राजू पाटलांनीही एक्स मीडियावर पोस्ट करत खासदार श्रीकांत शिंदे यांना चांगलंच डिवचलं होतं. “बापानं पॉकेट मनी म्हणून एमएमआरडीए, एमएसआरडीसीचा निधी दिला म्हणून करोडोच्या बाता? कामानं उत्तर दिले असते तर समस्या उरल्याच नसत्या. रेल्वेच्या प्रवाश्यांना रोज मरणयातना भोगाव्या लागल्या नसत्या”, अशी राजू पाटील यांनी एक्स मीडियावर पोस्ट केली होती.

भाजपाच्या आमदारांची उघड नाराजी : कल्याण लोकसभामधील भाजपाच्या तिन्ही आमदारांची मतदारसंघातील नागरी कामांच्याबाबतची नाराजीही लपून राहिली नाही. सत्ता संघर्षानंतर शिंदे-भाजपा गटात दुरावा निर्माण झाल्याच्या घटना वर्षभरापासून घडतच आहेत. “खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल आमदारांमध्ये नक्कीच नाराजी आहे. आमचा अधिकार राज्य शासनाच्या निधीमध्ये प्रत्येक ठिकाणी आहे. विकासकामांच्या उद्घाटनांच्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून आमचं त्या बोर्डवर नाव नसतं”, अशी नाराजी गणपत गायकवाड यांनी व्यक्त केलीय. तर “ग्रामीण भागातील योजना, राज्य शासनाच्या विशेष निधी, याबाबतच्या उद्घाटनाचं लोकार्पण सरकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते न करता शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी जाऊन उद्घाटन करतात”, अशी खंतही गणपत गायकवाड यांनी व्यक्त केली. काही महिन्यापूर्वीच कल्याण लोकसभा जागेवरुन भाजपाचे आमदार गणपत गायकवाडांनी शिंदे गटाला थेट 'गद्दार' म्हणत खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला होता. गायकावाडांनी केलेलं या आशयाची पोस्ट त्यावेळी प्रचंड 'व्हायरल' झाली होती. यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी, 'गायकवाडांचं वक्तव्य मनोरंजन म्हणून घेतले पाहिजे,' असा टोला लगावला होता.

राज्यात युती असली तरी कल्याणमध्ये दोन्ही पक्षातच वर्चस्वीची लढाई : डोंबिवली आणि उल्हासनगरमधील भाजपा आमदाराची नाराजी लपून राहिली नाही. राज्यात भाजपा-शिवसेना युती असली तरी कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध सेना असंच नाराजीचं वातावरण राहिलं आहे. भाजपा नेते, पदाधिकारी यांना शिवसेनेकडून सहकार्य मिळत नव्हते. त्यांना आडकाठी केली जात होती, अशी खदखद यापूर्वी भाजपाचे नेते आणि पदाधिकारी यांनी वरिष्ठांकडे अनेकदा व्यक्त केली. तर पाणी प्रश्नावर डोंबिवलीतील भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात थेट पोलीस उपायुक्तांकडे तक्रार दिली केली होती.

अनेक कारणांमुळं दुरी : गेल्या वर्षभरापासून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभा मतदार संघात चार वेळा आले होते. त्यांनी स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन लोकसभा निवडणुकीचं वातावरण निर्माण केलं. त्यामुळं कल्याण लोकसभेवरुन भाजपा शिंदे गटात दुरी निर्माण झाली. त्यातच डोंबिवली पूर्व भाजपाचे अध्यक्ष नंदू जोशी यांनी एका महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा शिंदे गटाच्या नेत्यांमुळं दाखल केल्याचा समज भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी करत मानपाडा पोलीस ठाण्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बदलीच्या मागणीसाठी भाजपानं मोर्चा काढला होता. त्यामुळं भाजपा शिंदे गटात आणखीच राजकीय तणाव निर्माण झाला. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यातच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाला मतदान आणि राजकीय मदत न करण्याचा निर्णय घेतला होता.

आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न : कल्याण लोकसभेवरुन स्थानिक भाजपा शिंदे गटात खदखद होऊन भाजपानं ठराव करत शिवसेना (शिंदे गटाला) मदत करणार नसल्याची भूमिका काही महिन्यापूर्वीच घेतली होती. यावरुन खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. मात्र यावर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी शिंदे भाजपा युती असून खासदार शिंदेंना राजीनामा देण्याची गरज नसल्याचं सांगून युतीत सर्वच आलबेल असल्याचं मत व्यक्त होतं. त्यामुळं कल्याण लोकसभेवरुन स्थानिक भाजपा शिंदे गटात खदखद निर्माण झालीय. मात्र भाजपाचे राष्ट्रीय नेते युतीत सर्वच आलबेल असल्याचं भासवून यावर अधिक बोलणं टाळत असल्याचं दिसून येतंय.

आव्हाड आणि शिंदेंमध्ये कुरघोडीचं राजकारण : कळवा मुब्रा विधानसभा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांची मजबूत पकड आहे. या परिसरातून नेहमीच आघाडीला भरभरुन मतदान पडलंय. येथील नागरी कामाच्या श्रेयामुळं आव्हाड - शिंदेमध्ये कुरघोडीचं राजकारण झाल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच सहा विधानसभा पैकी शिंदे गटाचा एकमेव आमदार अंबरनाथमध्ये आहे. मात्र याही मतदार संघात शिंदे गट - भाजपामध्ये काही प्रमणात नाराजी झाल्यानं याचा फटका डॉ. श्रीकांत शिंदेंना बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. भाजपाच्या वाढता दबावापुढं मुख्यमंत्री हतबल; विद्यमान ४ खासदारांची तिकिटं कापल्यानं तणाव वाढला - Lok Sabha Election 2024
  2. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर; बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.