ETV Bharat / politics

"...तर मी त्यावेळी पूर्ण पक्षच सोबत घेवून आलो असतो"; अजित पवारांचं शिंदे-फडणवीसांसमोर मोठं विधान - Ajit Pawar On Eknath Shinde

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 8, 2024, 7:52 AM IST

Updated : Aug 8, 2024, 8:45 AM IST

Ajit Pawar On Eknath Shinde : बुधवारी ठाण्यात ‘योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाषणादरम्यान आपल्या मनातील खंत शिंदे-फडणवीसांसमोर बोलून दाखवली.

Eknath Shinde And Ajit Pawar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (File Photo)

ठाणे Ajit Pawar On Eknath Shinde : विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. असं असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुस्तक प्रकाशन सोहळात एक मोठं विधान केलंय.

कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (ETV BHARAT Reporter)

फडणवीस-शिंदे दोघांनाही मी खूप सीनियर : बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपस्थित होते. "इतके आमदार घेवून आलात तर तुम्हाला मुख्यमंत्री करू असं एकनाथ शिंदे यांना त्यावेळी (भाजपाकडून) सांगण्यात आलं होतं. त्यावेळेस असं मला सांगितलं असतं तर, मी पूर्ण पक्ष सोबत घेवून आलो असतो. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही मी खूप सीनियर असून मी आजही मागे आहे," अशी खंतही अजित पवार यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर 'यांचा' फोटो पाहिजे होता : अजित पवार यांनी आपल्या भाषणात या पुस्तकांमधल्या काही त्रुटी देखील बोलून दाखवल्या. "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो पुस्तकाच्या मुखपृष्ठावर का नाही?," असा जाहीर सवाल अजित पवार यांनी लेखकांना विचारला. "पुढच्या आवृत्तीमध्ये याची दुरुस्ती व्हावी आणि आणखी काही गोष्टी ज्या मी वाचलेल्या नाहीत त्या वाचल्यानंतर मी सांगेन," असा सल्लाही लेखकाला दिला. "जर माझा सल्ला घेतला असता तर आणखी चांगले बदल होवू शकले असते," अशी खंत पवारांनी कार्यक्रमात बोलून दाखवली.

हे पुस्तक म्हणजे केवळ ट्रेलर - मुख्यमंत्री : "मी कुठलेही ग्रेट काम केलं नाही, तेव्हा उदात्तीकरण नको म्हणून माझा अशा पुस्तकाला सुरुवातीला नकार होता. आयुष्यात जे काम मिळालं ते प्रामाणिकपणे केलं. माझ्याकडून समाजाला काय मिळेल, या मार्गावर काम करत आहे. मुख्यमंत्री असलो तरी मी कार्यकर्ता म्हणूनच काम करत असून, पुढेही कार्यकर्ता म्हणूनच राहीन. हे पुस्तक म्हणजे माझ्या कारकिर्दीचा पिक्चर नाही, क्लायमॅक्स नाही तर केवळ ट्रेलर आहे. खरा पिक्चर अजून बाकी आहे. मला लोकनाथ बनायला अजून बराच वेळ आहे. कितीही थकलो तरी नातू रुद्रांश हेच माझं टॉनिक आहे," असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. "देवेंद्र आणि मी रात्रीपर्यंत काम करतो तर अजित पवार पहाटेपासूनच काम सुरू करतात. विकास आणि कल्याण हेच आमच्या कामाचं सूत्र आहे. तेव्हा कुणी काहीही म्हणोत लाडक्या बहिणींनी सावत्र भावांपासून सावध राहावं. असं आवाहन करत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला.

अशा पुस्तकामधून प्रेरणा मिळते : "माणूस एका दिवसात मोठा होत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी जो रेकॉर्ड केला तो कुणीच तोडुू शकत नाही. हेच त्यांच्या नायकपणाचं पुस्तक आहे. तेव्हा अशा प्रकारची पुस्तके यायला पाहिजेत. एखादा व्यक्ती कसा घडला हे समजून घेतलं तर प्रेरणा मिळते," असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचं कौतुक केलं.

अजित पवारांना सहसंपादक करा : "एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा सागर बंगल्यावर नाही तर राजभवनावरील पत्रकार परिषदेत झाली. त्यामुळं पुस्तकात हा बदल करावा. तसंच दुसऱ्या आवृत्तीत अजितदादांना सहसंपादक करावं," अशी मिश्किल टिप्पणीही फडणवीस यांनी केली. या पुस्तकावर धर्मवीर आनंद दिघेंचा फोटो पाहिजे होता, या आणि अशा अनेक त्रुटींवर बोट ठेवून लेखकांना आणि निमंत्रक उदय सामंत यांनाही अजित पवारांनी कानपिचक्या दिल्या.

हेही वाचा -

  1. 'आप'ने 'इंडिया' आघाडीची साथ सोडली? महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार - Maharashtra Politics
  2. बॅनरवरील धनुष्यबाण चिन्ह फाडल्यानं शिंदे गट आणि उबाठा गटात राडा : 'बॅनर फाडताना रंगेहात पकडलं' - Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
  3. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत गोंधळ : 'सह्याद्री'बाहेर घोषणाबाजी, वाचा काय आहे कारण? - Koli community meeting

Last Updated : Aug 8, 2024, 8:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.