सातारा Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) सातारा दौऱ्यावर आहे. तर महाराष्ट्रात तीन टप्प्यात २४ मतदारसंघात मतदान पूर्ण झाले आहे. राजकीय पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे सहा उमेदवार निवडून आले होते. यावेळी लोकांना बदल पाहिजे आहे. निवडणुकीत तसा ट्रेंड दिसून आला असून आम्हाला सर्वांना (महाविकास आघाडी) मिळून ३० ते ३५ जागा मिळतील, असा अंदाज राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी वर्तवला.
राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला लोकांचा पाठिंबा : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शरद पवार गुरूवारी साताऱ्यात आले होते. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या विचारांबरोबरच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लोक समर्थन देत आहेत. आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळत असल्याने यावेळी आमची संख्या ३० ते ३५ खासदारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.
मोदींचा आत्मविश्वास कुठं गेलाय ते समजतंय : शिवाजी पार्कवर होणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभेच्या संदर्बात शरद पवार म्हणाले की, सभेत काय होतंय ते बघुया. मोदींना कोणा- कोणाची मदत हवी आहे, हे यातून दिसते. त्यांचा आत्मविश्वास कुठं गेलाय, हेही समजतंय, अशा खोचक टोलाही पवारांनी लगावला.
अजितदादांना दिला उपरोधिक सल्ला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार स्वतःच सर्व निर्णय घेतात, पण पक्षानं निर्णय घेतल्याचं दाखवतात, या अजित पवारांच्या टीकेवर शरद पवारांनी अजितदादांना उपरोधिक सल्ला दिला. त्यांनी त्यांचा पक्ष नीट चालवावा. दुसऱ्याच्या पक्षात तोंड घालू नये, असं शरद पवार म्हणाले.
हेही वाचा -
- "ठाकरे गट आणि संजय दिना पाटील यांना मराठी-गुजराती वाद...", नेमकं काय म्हणाले मिहीर कोटेचा? वाचा सविस्तर - Mihir Kotecha Exclusive Interview
- मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस; काय आहे प्रकरण? - Sudhakar Badgujar
- "शरद पवारांच्या मनात असतात तेच निर्णय घेतात, कधी-कधी संभ्रम निर्माण करण्यासाठी..."अजित पवारांची टीका - Ajit Pawar Vs Sharad Pawar