ETV Bharat / politics

24 वर्षानंतर उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? कोल्हापुरातील 'या' नेत्यानं स्पष्टच सांगितलं - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

सुजित मिणचेकर यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.

Hatkanangale Assembly Election 2024 Sujit Minchekar tell the reason behind why he left Shivsena UBT and Join Parivartan Mahashakti Aghadi
सुजित मिणचेकर, उद्धव ठाकरे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2024, 12:19 PM IST

कोल्हापूर : 24 वर्ष शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता ते हातकणंगले विधानसभेचा दोनदा आमदार, जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाचे संचालक, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून 'महाशक्ती परिवर्तन आघाडी'त प्रवेश केला आहे. तिसऱ्या आघाडीकडून यंदाच्या विधानसभेसाठी मिणचेकर मैदानात उतरले आहेत. यंदा चार टर्म त्यांच्यासोबत असलेलं पक्षाचं चिन्ह आणि नेताही नसताना हातकणंगलेतील शिवशक्ती-भीमशक्ती आणि आता महाशक्ती या त्रिवेणी संगमावर विजयापर्यंत पोहोचणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. तसंच उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ का सोडली? याबाबतही मिणचेकर यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपली भूमिका मांडली आहे.

मतदारसंघ पुनर्रचना होण्याआधीचा कोल्हापुरातील वडगाव आणि आताचा हातकणंगले विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. 1980 पासून सलग पाच वेळा या मतदारसंघात जयवंतराव आवळे यांनी एकहाती निवडून येत वर्चस्व निर्माण केलं. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत जन स्वराज्य शक्ती पक्षाकडून राजू किसन आवळे यांनी जयवंतराव आवळे यांच्या एक हाती सत्तेला सुरूंग लावत पहिल्यांदा विधानसभेत एन्ट्री केली होती. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर डॉ. सुजित मिणचेकर यांनी जयवंतराव आवळे यांचे सुपुत्र राजू आवळे यांचा पराभव करत विधानसभा गाठली होती. मिणचेकर हातकणंगले मतदारसंघातून दोनदा निवडून येण्यात यशस्वी ठरले. मात्र, 2019 मध्ये काँग्रेसच्या राजू आवळे यांनी त्यांचा पराभव केला. राज्यात आकाराला आलेल्या महाविकास आघाडीमुळं ही जागा काँग्रेसला गेल्यानं नाराज झालेली मिणचेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अखेर जय महाराष्ट्र करत छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन महाशक्ती आघाडीत प्रवेश करत ते आता विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत.

सुजित मिणचेकर यांची मुलाखत (ETV Bharat Reporter)

उद्धव ठाकरे यांच्याशी घनिष्ठ संबंध : एक सामान्य शिवसैनिक ते आमदार अशी जिल्ह्याच्या राजकारणात ओळख निर्माण करणाऱ्या मिणचेकर यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. मात्र, हातकणंगले विधानसभेतील कार्यकर्ते यंदाची विधानसभा लढलीच पाहिजे असा हट्ट धरून बसले आणि मिणचेकर यांचा नाईलाज झाला. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला मिणचेकर यांनी हजेरी लावली होती. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी चर्चा करून माझ्या कार्यकर्त्यांसाठी मला हा निर्णय घ्यावा लागेल, असं सांगून मी बाहेर पडलो. मात्र, ठाकरे यांच्याशी माझी नाळ यापुढंही कायम राहणार असल्याचं, सुजित मिणचेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

शिवशक्ती, भीमशक्ती आणि आता महाशक्ती : कोल्हापूर जिल्ह्यात शिवशक्ती, भीमशक्तीचा यशस्वी प्रयोग करणारे आमदार म्हणून डॉ. सुजित मिणचेकर यांची ओळख आहे. दोनदा आमदार होऊनही मोठे प्रकल्प मतदारसंघात आणण्यात अयशस्वी ठरल्यामुळं गतवर्षी त्यांचा पराभव झाला. मात्र, आता मोठे प्रकल्प आणण्यासोबतच मतदारसंघाला पर्यटनाचं हब बनवण्याचा मानस असल्याचं सांगत शिवशक्ती, भीमशक्ती आणि महाशक्ती या त्रिवेणी संगमावर आपण विजयापर्यंत पोहोचणार असल्याचं मिणचेकर यांनी सांगितलं.

हातकणंगलेत ठरतो जात फॅक्टर महत्त्वाचा : पुरोगामी विचाराचा तालुका म्हणून जिल्ह्यात हातकणंगले तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यातील माणगाव या गावात आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांची पहिली परिषद 1920 मध्ये घेतली होती. बौद्ध समाजानंतर मातंग आणि जैन या दोन्ही समाजाची संख्या अधिक असल्यामुळं या विधानसभा मतदारसंघात जात फॅक्टर महत्त्वाचा ठरतो. यंदा या विधानसभेसाठी तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसकडून राजू आवळे, जनसुराज्य पक्षाकडून अशोकराव माने तर परिवर्तन महाशक्तीकडून मिणचेकर नशीब आजमावणार आहेत. मतदारसंघात 3 लाख 38 हजार 366 नोंदीत मतदार आहेत. आवळे यांचं येथील मातंग समाजावर प्राबल्य आहे. तर, मिणचेकर यांना बौद्ध, मातंग आणि जैन समाजातील लोकांचं पाठबळ आहे. शैक्षणिक संस्थांच्या ताकदीवर अशोकराव माने या निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळं तिन्ही समाजातील मतदानावर येथील उमेदवाराचा विजय अवलंबून आहे.

हेही वाचा -

  1. कोल्हापूर जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघात घराणेशाहीचा सिलसिला कायम, वारसदारांसाठी नेते आग्रही
  2. तिसऱ्या आघाडीच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बच्चू कडूंसह 'हे' उमेदवार रिंगणात
  3. 150 जागांवर एकमत, 'परिवर्तन महाशक्ती'नं फुंकलं रणशिंग; मनोज जरांगे पाटलांसोबतही चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.