ETV Bharat / politics

भाजपाचं 'संकल्प पत्र' नसून मोदी सरकारची गॅरंटी; देवेंद्र फडणवीस आणि प्रमोद सावंतांची गॅरंटी - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याला भाजपानं मोदींची गॅरंटी असं नाव दिलं. याच जाहीरनाम्याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, हे केवळ भाजपाचं ‘संकल्प पत्र’ नाही तर मोदीजींची गॅरंटी आहे. आज नागपूर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Lok Sabha Election 2024
देवेंद्र फडणवीस आणि प्रमोद सावंतची नागपूरला गॅरंटी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 9:09 PM IST

प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस आणि डॉ. प्रमोद सावंत

नागपूर Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सोमवारी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. मात्र, हे 'संकल्प पत्र' नसून मोदी सरकारची गॅरंटी असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हणाले आहे. भारताला उज्वल भविष्य घडवण्याची ही सर्वोत्तम वेळ आणि संधी आहे, असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्हणाले. भाजपाच्या संकल्प पत्रावर 4 जूननंतर वेगात काम सुरू होईल. सरकारनं सुरुवातीच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यावर ही काम सुरू केली आहेत. देशातील 140 कोटी देशवासीयांची महत्त्वाकांक्षा म्हणजे 'मोदींचं मिशन' असल्याचं ते म्हणाले.

विकसित भारताचा दृष्टीकोन : भारतीय जनता पक्षाच्या संकल्प पत्रात एनडीए सरकारच्या कामगिरीचा सर्वसमावेशक व्यापक आढावा दिसून येतोय. 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती करण्याचा दृष्टीकोन सादर करतो. हा जाहीरनामा विकसित भारताच्या युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या 4 मजबूत स्तंभांना सामर्थ्य देतो. आमचं लक्ष्य जीवनाची प्रतिष्ठा, जीवनाचा दर्जा, तसेच गुंतवणूक आणि नोकऱ्यांवर असल्याचं फडणवीस म्हणाले.

नोकऱ्या निर्माण करण्याबद्दल विचार : या संकल्प पत्रात संधींचं प्रमाण आणि संधींची गुणवत्ता दोन्हींवर भर देण्यात आला आहे. एकीकडं, आपण अनेक पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे देशात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण करण्याबद्दल बोलत आहोत. दुसरीकडं, आम्ही स्टार्टअप्स आणि जागतिक केंद्रांना प्रोत्साहन देऊन उच्च मूल्यांच्या सेवांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. गरिबांच्या ताटात पौष्टिक, समाधानकारक आणि परवडणारे अन्न असेल याची आम्ही खात्री देऊ. मोफत रेशन योजना पुढील 5 वर्षे सुरू राहील,अशी मोदींची हमी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.

वृद्धांसाठी संकल्प : भाजपानं संकल्प केला आहे की, 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणलं जाईल. 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय असो, त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे. ज्यांना कोणी विचारलं नाही, त्यांना मोदी विचारत आहेत. 'सबका साथ, सबका विकास' हाच आत्मा आहे आणि हाच भाजपाच्या 'संकल्प पत्रा'चा आत्मा देखील आहे.

स्त्री शक्तीच्या सहभाग असेल : गेली 10 वर्षे महिलांचा सन्मान आणि महिलांसाठी नवीन संधींसाठी प्रयत्नरत राहिलो आहोत. येणारी 5 वर्षे स्त्री शक्तीच्या नव्या सहभागाची असतील.

भारताला अन्नप्रक्रिया केंद्र बनवणार : भारताला अन्नप्रक्रिया केंद्र बनवण्याचा भारतीय जनता पक्षाचा संकल्प आहे. यामुळं मूल्यवर्धन होईल याचा शेतकऱ्याचा फायदा वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील. हे अन्न प्रक्रिया प्रकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेचं नवीन विकास इंजिन बनतील.

पर्यटन क्षेत्राचा विकास करणार : आपल्या देशातील पर्यटनाची क्षमता अद्याप ही उघड होऊ शकलेली नाही. भारतीय जनता पक्ष जगभरातील जागतिक पर्यटकांना आपल्या वारशाशी जोडणं आणि हा वारसा जागतिक वारशांशी जोडण्याचा प्रयत्न आहे.

देशहितासाठी कठोर निर्णय घेतले जातील : देशहिताचं मोठं आणि कठोर निर्णय घेण्यास भारतीय जनता पक्ष कधीही मागे हटत नाही. आमच्यासाठी पक्षापेक्षा देश मोठा आहे. 'महिला शक्ती वंदन अधिनियम' कायदा झाला आहे. आमच्या सरकारनं कलम 370 हटवलं आणि आम्ही CAA आणलं. आम्ही सुधारणा-कार्य-परिवर्तन या मंत्राचं पालन करत आहोत.

मोफत उपचार सुविधा : सर्व जनऔषधी केंद्रांवर स्वस्त औषधे 80 टक्के सवलतीत उपलब्ध होतील आणि जनऔषधी केंद्रांचा विस्तारही केला जाईल. 'आयुष्मान भारत' योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळत राहतील. मोदींच्या हमीमध्ये भाजपानं 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणण्याचा मोठा निर्णय घेतलाय.आमचं सरकार 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला मग तो गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय असो, आमचं सरकार 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा -

  1. महायुतीचे शक्ती प्रदर्शन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संजय मंडलिक, धैर्यशील माने यांनी भरला उमेदवारी अर्ज - Lok Sabha Election 2024
  2. संजय राऊतांना मानसिक उपचाराची गरज; आरोपांनंतर श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल - Shrikant Shinde On Sanjay Raut
  3. नटसम्राट खासदार पाहिजे की कार्यसम्राट, अजित पवारांचा सवाल; अमोल कोल्हेंसह सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर - Ajit Pawar vs Amol Kolhe

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.