ETV Bharat / politics

Lok Sabha Elections : भाजपाकडून आचारसंहितेचं सर्रास उल्लंघन; कारवाई न झाल्यास हाताचा पंजा देणार भेट, काँग्रेसचा आरोप

Lok Sabha Elections : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिनांक 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आलीय. निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू करण्यात आलीय. मात्र पुण्यात भाजपाकडून आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याचा आरोप, काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केलाय.

Lok Sabha Elections
काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 4:54 PM IST

प्रतिक्रिया देताना आमदार रवींद्र धंगेकर आणि काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी

पुणे Ravindra Dhangekar : देशभरात पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) होणार आहे. तीन दिवसांपूर्वीच देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आलीय. तर पुणे शहरात भारतीय जनता पक्षाकडून आचारसंहितेचे सर्रास उल्लंघन होत आहे, असा आरोप होतोय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अन्यथा दोन दिवसात आम्ही मुख्य निवडणूक आयोगाला काँग्रेसच चिन्ह 'पंजा' भेट देऊ असा इशारा, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिलाय.

निवडणूक आयोगाला हाताचा पंजा भेट देणार : पुणे शहरात भाजपाकडून आचारसंहितेचं सर्रास उल्लंघन होत आहे. आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेत त्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केलीय. शहरात ज्या विविध ठिकाणच्या भिंतीवर भारतीय जनता पक्षाची जाहिरात लावण्यात आली आहे. ती दोन दिवसात कमळ चिन्हे पुसली नाहीत तर, परवा निवडणूक आयोगाला हाताचा पंजा भेट देणार, असं यावेळी आमदार धंगेकर म्हणाले.

भारतीय जनता पार्टीकडून भिंतीवर कमळ चिन्ह : यावेळी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, आचारसंहिता असून देखील भारतीय जनता पार्टीकडून भिंतीवर कमळ चिन्ह काढले जात आहे. निवडणूक आयोगाने यांना आवर घालावा. भाजपाकडून पुणे शहरातील भिंती विद्रुप करून टाकल्या आहेत. भाजपाकडून निवडणुका हायजॅक करण्याच्या प्रयत्न चालू आहे. दोन दिवसात कारवाई न केल्यास निवडणूक आयोगाला हाताचा पंजा भेट देणार आहे.

चिन्ह हाताचा पंजा असणार : यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, पुणे शहरात शासकीय पैशाने मोदींचे फोटो आणि कमळ चिन्हं काढली आहेत. आचारसंहिता लागून 72 तास उलटले तरी देखील फलक काढलेले नाहीत. ताबडतोब याच्यावर कारवाई झाली पाहिजे. 24 तासात कारवाई करा अन्यथा, आम्ही फोटो काढून आणून देऊ. पुण्यातील उमेदवारीबाबत जोशी पुढे म्हणाले की, रवींद्र धंगेकर आणि मी दोघेही इच्छुक आहोत. पण आमचा उमेदवार हा काँग्रेसचा असणार आहे आणि चिन्ह हाताचा पंजा असणार.

हेही वाचा -

  1. Amit Thackeray News : निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे कुटुंबातील दुसरे सदस्य उतरणार? अमित ठाकरे यांच्या नावाची 'या' मतदारसंघाकरिता चर्चा
  2. Raj Thackeray News: राज ठाकरे एनडीएमध्ये सहभागी होणार? अमित शाह यांच्याबरोबर अर्धा तास झाली बैठक
  3. BJP MNS Alliance : राज ठाकरे-अमित ठाकरे दिल्ली दरबारी; भाजपा-मनसेमध्ये बंद दाराआड घडतंय बरंच काही, दक्षिण मुंबईसाठी आग्रही?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.