ETV Bharat / politics

ठाकरेंसमोर काँग्रेस चितपट; दोन कळीच्या जागांवर मारली बाजी - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) दक्षिण-मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही होत्या. त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केल्यानं ही जागा काँग्रेसला मिळावी, अशी त्यांची मागणी होती. त्यामुळं या जागेसाठी त्या सुरुवातीपासून आग्रही होत्या. परंतु येथे शिवसेना ठाकरे गटाने अनिल देसाई (Anil Desai) यांना मैदानात उतरवलं आहे. यासाठी काँग्रेसकडून प्रचार केला जाणार आहे. तर दुसरीकडं सांगलीच्या जागेवरुनही काँग्रेस बॅकफूटवर असल्याचं दिसतंय.

Lok Sabha Election 2024
वर्षा गायकवाड नाना पटोले उद्धव ठाकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 6:27 PM IST

Updated : Apr 16, 2024, 6:44 PM IST

मुंबई Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या तोफा बुधवारी थंडावणार आहेत. उर्वरित लोकसभा मतदारसंघात प्रचाराला जोरदार वेग आलाय. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडी असल्याची जोरदार टीका महायुतीकडून केली जात आहे. तर दुसरीकडं दक्षिण मध्य मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. काँग्रेसनं दक्षिण मध्य मुंबईवरील दावा सोडला असून, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई (Anil Desai) यांच्यासाठी आता काँग्रेसकडून प्रचार केला जाणार आहे.

दोन मतदारसंघात काँग्रेस बॅकफूटवर? : दक्षिण मध्य मुंबई आणि सांगली अशा दोन मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केला होता. या दोन्हीपैकी एकतरी मतदारसंघ मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र, ठाकरे गटानं सांगलीसाठी आधीच उमेदवार जाहीर केला होता. त्यामुळं ती जागाही काँग्रेसला सोडावी लागली. आता दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरील दावाही काँग्रेसनं सोडला आहे.

महायुतीनं आमची काळजी करू नये : मुंबईमधील काही मतदारसंघातून काँग्रेस आणि ठाकरे गटात अर्थात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचा आरोप महायुतीकडून केला जात आहे. त्यातच मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, आमदार अस्लम शेख आणि नसीम खान नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "महायुतीला सांगणं आहे की, आमच्या महाविकास आघाडीत चांगल्या प्रकारे समन्वय आहे. पक्ष संघटना म्हणून पक्षश्रेष्ठींच्या कानावर काही गोष्टी सांगणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण अस्लम शेख आणि नसीम खान यांच्यासह दिल्लीला गेलो होतो. मुंबईतील सहाही जागा महाविकास आघाडीच्या निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. त्यासाठी वाटेल ते योगदान आम्ही देण्यास तयार आहोत. महाविकास आघाडीचे अनिल देसाई यांच्या प्रचारसभेत मी देखील उपस्थित राहणार आहे. कुरघोडी आणि खोटं बोलायची परंपरा भाजपाची आहे. उलट त्यांचेच उमेदवार त्या मतदारसंघातील जाहीर झालेले नाहीत. त्यामुळं महायुतीनं आमची काळजी करू नये."

अनिल देसाई यांना उमेदवारी : दक्षिण-मध्य मुंबईमधील इतिहास पाहिला असता येथून वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनी चार वेळा निवडणूक लढविली होती. "पक्षाला हा मतदारसंघ मिळावा अशा प्रकारचा आग्रह पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी लावून धरला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनिल देसाई यांना येथील उमेदवारी मिळाली आहे. आता त्यांच्यासाठी पूर्णपणे आम्ही काम करणार आहोत. आम्ही पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून पक्षानं तिकीट दिलं तरी काम करायचं आणि दिलं नाही तरी काम करायचं अशा पद्धतीची पक्ष एकनिष्ठतेची शिकवण वडिलांनी आणि पक्षाकडून देण्यात आलीय. धारावीच्या जनतेसाठी आपण आताही काम करत असून पुढे देखील असंच काम करणार आहोत," असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

कार्यकर्त्यांची भावना पक्षश्रेष्ठींकडं मांडल्या : "दक्षिण-मध्य मुंबईमधील कार्यकर्त्यांची भावना आम्ही पक्षश्रेष्ठींकडं दिल्ली दरबारी मांडली आहे. मुंबई काँग्रेसचे आमदार म्हणून या भावना आम्ही पक्षश्रेष्ठींकडं मांडल्या आहेत. पक्षानं दिलेल्या सूचनेनुसार, आम्ही आता कामाला लागलो आहोत. मुंबईमधील सहाही मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील." असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलाय. सगळ्या लोकसभा मतदारसंघात आपण प्रचाराला देखील उतरणार आहोत, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. त्यामुळं त्यानी नाराज नसल्याचं स्पष्ट केलंय.

हेही वाचा -

  1. पाहिजे असलेले मतदारसंघ न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज होणारच, पक्षश्रेष्ठींकडं भावना कळवल्या - वर्षा गायकवाड - Lok Sabha Election 2024
  2. भाजपाकडून उदयनराजे भोसले यांना अखेर उमेदवारी जाहीर, काय आहे साताऱ्यात स्थिती? - udayanraje bhosle
  3. भाजपाला हटवण्यासाठी आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा - असदुद्दीन ओवैसी - Lok Sabha Election 2024

Last Updated : Apr 16, 2024, 6:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.