ETV Bharat / politics

राजकीय जीवनात शांत, संयमी देवेंद्र फडणवीस कसे होते शाळेत? शाळेतील वर्गमित्रांनी सांगितल्या फडणवीसांच्या आठवणी - DEVENDRA FADNAVIS JOURNEY

देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या राजकीय जीवनाव्यतिरिक्त शालेय जीवनातील काही आठवणी त्यांच्या वर्ग मित्रांनी ईटीव्ही भारतला सांगितल्या.

Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2024, 7:52 PM IST

नागपूर : देवेंद्र फडणवीस हे मित्रत्वाला जगणारे नेते आहेत असं कायम म्हटलं जातं. राजकीय जीवनात राहूनसुद्धा त्यांनी बालपणीचे मित्र जपले आहेत. पक्षाच्या पलीकडं जाऊन देवेंद्र फडणवीस हे मैत्री जपतात. सर्वच राजकीय पक्षात त्यांचे मित्र आहेत. पण ज्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी शाळेत बालपण घालवलं त्या मित्रांना फडणवीस यांच्याबद्दल काय वाटतं हे जाणून घेऊया.

शाळेत फडणवीस शांत आणि संयमी : देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतील किंवा ते राजकीय जीवनात इतके यशस्वी होतील असं त्यावेळी कुणालाही वाटलं नाही. एकदम शांत आणि संयमी असलेले देवेंद्र हे लाजाळू देखील होते. देवेंद्र एकपाठी असल्यानं त्यांना एकदा वाचलेलं कायम लक्षात राहायचं. त्यामुळं अभ्यासाची घोकंपट्टी त्यांना कधीही करावी लागत नाही, अश्या आठवणी त्यांच्या मित्रांनी सांगितल्या.

प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांचे मित्र (ETV Bharat Reporter)

आमच्या मित्राचा आम्हाला अभिमान : देवेंद्र फडणवीस यांनी शालेय जीवनानंतर एकदम गियर चेंज केला. शाळेत गणिताशी फारसे जमत नसताना देखील आज त्यांना बजेटचे आकडे हे तोंडपाठ झाल्याचं दिसतं. त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. त्यामुळं कायदे त्यांना तोंडपाठ झाले. असा नेता आम्ही आजवर पहिला नव्हता. आमचा मित्र मुख्यमंत्री होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो अशा भावना, त्यांच्या मित्रांनी व्यक्त केल्या.

देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द : देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. राजकारणाचे बाळकडू त्यांना त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांच्या पासून मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या काळात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. ४४ व्या वर्षी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शरद पवार यांच्यानंतर ते महाराष्ट्राच्या इतिहासातील दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. २०१९ ते २०२२ या काळात महाराष्ट्राचे ते विरोधीपक्ष नेते होते. त्यानंतर २०२२ ते २०२४ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा होते. २०१३ ते २०१५ काळात त्यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडली होती. त्यांच्या नेतृत्वात भाजपानं २०१४ ची विधानसभा निवडणूक लढवली होती.

नगरसेवक ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास : देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीला अगदी लहान वयात सुरुवात झाली. १९९२ साली ते नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आणि सलग दोनवेळा त्यांनी काम केलं. त्यानंतर ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले होते. ‘मेयर इन कौन्सिल’ या पदावरही ते निवडून गेले होते. ते सलग ५ वेळा महाराष्ट्र विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचं शिक्षण : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी कायद्याची पदवी घेतली. व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी सुद्धा त्यांच्याकडं आहे.

हेही वाचा -

  1. ...त्यामुळं शपथविधीसाठी निवडला 'हा' दिवस, ज्योतिषाचार्य यांनी सांगितलं गुपित
  2. खास देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कोल्हापुरात बनलं 'मोदी जॅकेट'
  3. ठरलं! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.