पुणे Lok Sabha Elections : पुढील महिन्यात देशभरात लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. अशातच लोकसभा निवडणुकीसंदर्भात आज पुण्यात सकल मराठा समाजाची बैठक (Maratha Samaj Meeting) पार पडली. या बैठकीत पुण्यातून देखील एक उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.आजच्या मराठा समाजाच्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी अध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) देखील उपस्थित होते.
आजच्या बैठकीत पुण्यातून देखील मराठा समजाचा एक उमेदवार देणार असल्याचं निर्णय घेण्यात आलाय. पुणे लोकसभा मतदार संघासाठी मनोज जरांगे पाटील हे जो मराठा उमेदवार देतील, त्या उमेदवाराला आमच्याकडून पाठिंबा असणार आहे. त्या उमदेवाराला विजयी करण्यासाठी सर्वच मराठा बांधव पाठिशी राहतील. – सचिन आडेकर, समन्वयक, सकल मराठा समाज
मनोज जरांगे पाटील यांच्याकडं पाठविण्यात येणार : या बैठकीमध्ये मनोग जरांगे यांनी केलेल्या सुचनेनुसार इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलीय. 18 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 30 मार्चपर्यंत पुण्यातील इच्छुकांचे अर्ज भरुन घेऊन ते सर्व अर्ज मनोज जरांगे यांच्याकडं पाठविण्यात येणार आहेत. मनोज जरांगे हे पुण्यातील उमेदवार जाहिर करणार आहेत. दरम्यानच्या काळात प्रत्येक प्रभागामध्ये छोट्या छोट्या बैठका घेऊन मराठा समाजाच्या मतांचा विचार केला जाणार असल्याचं या बैठकीत ठरविण्यात आलंय.
हेही वाचा -
- ठरलं! ठाकरे गटाची 15 उमेदवारांची यादी जाहीर होणार, ठाकरे गट किती जागा लढवणार? - Lok Sabha Elections
- ...म्हणून शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये 'मातोश्री'वर झाली बैठक; नितेश राणेंचा गंभीर आरोप - Nitesh Rane On MVA
- रायगडमधून सुनील तटकरेंना उमेदवारी जाहीर; पत्रकार परिषदेत अजित पवारांची घोषणा - NCP candidate list