ETV Bharat / politics

"...तर यंदा भारत हिंदूराष्ट्र झाला असता"; 400 पारच्या नाऱ्यावर भाजपा आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य - T Raja Singh Statement - T RAJA SINGH STATEMENT

T Raja Singh Statement : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे संत संमेलनासह हिंदू धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. या धर्मसभेमध्ये भाजपा आमदार टी. राजा सिंह (T Raja Singh) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय.

BJP MLA T Raja Singh
भाजपा आमदार टी. राजा सिंह (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 7:00 PM IST

Updated : Jun 16, 2024, 7:06 PM IST

ठाणे T Raja Singh Statement : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे संत संमेलन आणि हिंदू धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मुख्य मार्गदर्शक म्हणून तेलंगणा येथील प्रक्षोभक वक्तव्य करण्यामुळं चर्चेत असणारे, आमदार टी. राजा सिंह (T Raja Singh) हे उपस्थित होते. या सभेत त्यांनी "लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपा 400 पार झाले असते तर भारत हिंदूराष्ट्र झाले असते" असं सांगताच उपस्थितांनी जयजयकार केला. यावेळी व्यासपीठावर बालयोगी सदानंद महाराज, महंत शिर चिदानंद सरस्वती, स्वामी गोविंदगिरी, महंत फुलनाथ बाबा, आयोजक शिवरूपानंद स्वामी उपस्थित होते. तर सभेला तालुक्यातून हजारोंच्या संख्येने हिंदू धर्मीय उपस्थित होते.

सभेत बोलाताना आमदार टी. राजा सिंह (ETV Bharat Reporter)

किल्ल्यांवरील कब्जा साफ करावा : हिंदू धर्मसभेत धर्मांतर बंदी कायदा पारित करण्यात यावा, वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यात यावा, लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा, गो हत्या बंदी करून अंमलबजावणी व्हावी, बेकायदेशीर भूमी अतिक्रमण हटविण्यात यावे असे विविध ठराव पारित करण्यात आले. या सभेत बोलताना टी. राजा सिंह यांनी महाराष्ट्रात मठ मंदिर सुरक्षित नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 370 किल्ले जिंकले पण दुर्दैव म्हणजे शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात 100 किल्ल्यांवर मशीद आणि दर्गा बनविण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुका आहेत त्यापूर्वी किल्ल्यांवरील कब्जा साफ करावा असं आवाहन त्यांनी एकनाथ शिंदे यांना केलं आहे.

...तर भारत कधीच हिंदूराष्ट्र होणार नाही : महाराष्ट्रात 1 लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. तर भारतात 10 लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूंसाठी रुग्णालय, क्रीडांगण, महाविद्यालय, घर बनवा असं आवाहन केलं. शिवाय हिंदू मुस्लिम भाई भाईचा नारा देत मुस्लिमांकडून लव्ह जिहाद राबवला जातो. महाराष्ट्रात लव्ह जिहाद, गो हत्या, धर्मांतर यावर कायदा का होत नाही असा सवाल विचारत हिंदू एक झाला नाही तर भारत कधीच हिंदूराष्ट्र होणार नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

मलंगगड मुक्ती केली पाहिजे : महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणाचं भय आहे. त्यांच्यामागे सर्व हिंदू समाज उभा आहे. त्यांनी मलंगगड मुक्ती केली पाहिजे. मलंगगड मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी आहे. पण तो दर्गा असल्याचं सांगून हिंदूंची थट्टा केली जात आहे. हिंदुत्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगड मुक्ती केली पाहिजे अशी मागणी केली. "जो हिंदू हित की बात करेगा वह, महाराष्ट्र पर राज करेगा" अशी घोषणा त्यांनी केली.

टी. राजा सिंह यांना दर्शवला होता विरोध : भिवंडी तालुक्यातील पडघा टोलनाका परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित सभेत तेलंगाना येथील आमदार टी. राजा सिंह यांची प्रमुख उपस्थिती असल्यानं, महाविकास आघाडीचे नवनियुक्त खासदार सुरेश म्हात्रे यांनी या कार्यक्रमास विरोध नसून या कार्यक्रमासाठी येणारे टी. राजा सिंह यांना विरोध दर्शवला होता. टी. राजा सिंह यांच्या वक्तव्यामुळं भिवंडी शहरातील वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळं या कार्यक्रमास त्यांना परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी शुक्रवारी पोलीस यंत्रणेकडं केली होती.

कपिल पाटील यांच्यावर आरोप : या कार्यक्रमाच्या आयोजनावरून खासदार सुरेश म्हात्रे यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हा कार्यक्रम कपिल पाटील यांच्या छुप्या अजेंड्यानं आयोजित केला आहे. पाटील स्वतः या कार्यक्रमासाठी पुढाकार घेत आहेत. या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही परंतु मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवरच या कार्यक्रमाचे आयोजन का करण्यात आलं? असा सवाल, सुरेश म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. शहरात जातीय तेढ आणि भिवंडीत दंगली घडवण्याचा कट कपिल पाटील करित असल्याचा आरोपही खासदार सुरेश म्हात्रे यांनी केलाय.

टी. राजा सिंह यांच्यावर गुन्हे दाखल : तेलंगणा येथील आमदार टी. राजा सिंह यांच्यावर १०५ हुन अधिक गुन्हे दाखल आहेत, तर १८ ते २० गुन्हे जातीय तेढ निर्माण करणारे आहेत. भिवंडी मुस्लिम बहुल शहर आहे. अशा ठिकाणी जर जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य होत असेल तर, वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सकल हिंदू समाजाच्या सभेला विरोध नसून या सभेमध्ये वक्तव्य करणारे टी. राजा सिंह यांना विरोध असल्याचं म्हात्रे यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. "बाप बाप होता है!" सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीतही बॅनर वॉर, उदय सामंत यांच्या गावात लागले भाजपाचे बॅनर - BJP Banner War
  2. फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा हट्ट सोडावा, ३५ लाख भाजपा कार्यकर्त्यांची मागणी - Devendra Fadnavis
  3. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्यासाठी देवेंद्र फडणवीस लागले कामाला; निवडणुकीसाठी कसली कंबर - Devendra Fadnavis

Last Updated : Jun 16, 2024, 7:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.