ETV Bharat / health-and-lifestyle

प्रेशर कुकरमधून पाणी बाहेर येतं? वापरा या ट्रिक

Pressure Cooker Leakage: स्वयंपाक करताना कुकरमधून पाणी बाहेर फेकलं जातं. फॉलो करा खाली दिलेल्या ट्रिक होईल समस्येचं निराकरण.

Pressure Cooker Leakage
प्रेशर कुकरमधून पाणी बाहेर येतं (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Oct 25, 2024, 5:29 PM IST

Updated : Oct 26, 2024, 10:39 AM IST

Pressure Cooker Leakage: झटपट स्वयंपाक तयार करण्यासाठी आपण प्रेशर कुकरचा वापर करतो. डाळ, भात, भाजी आणि मांससारखे पदार्थ प्रेशर कुकरमध्ये लवकर शिजतात. यामुळे बहुतांश महिला त्यात स्वयंपाक करणं पसंत करतात. परंतु कुकर वापरताना अनेक समस्यांचा समना करावा लागतो. कधी कुकरच्या झाकणातून पाणी बाहेर येतं. तर, कधी शिट्टी वाजत नाही. याशिवाय कधी अन्न अतिप्रमाणात शिजतं तर कधी शिजत नाही. अशा एक ना अनेक समस्या उत्पन्न होतात. तुम्ही देखील अशा समस्येनं त्रस्त आहात काय? याकरिता आम्ही तुमच्यासाठी काही ट्रिक्स घेऊन आलोय. यामुळे तुम्हाला कुकरच्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.

  • रबर तपासा: कुकरमध्ये अन्न शिजवण्यापूर्वी बहुतेक लोक कुकर स्वच्छ आहे की नाही याची खात्री करतात. मात्र, कुकरच्या रबरकडे (गॅस्केट) कुणाचं लक्ष नसतं. रबर व्यवस्थित बसला नसल्यामुळे देखील बहुतेक वेळा कुकरमधून पाणी गळतं. त्यामुळे रबर घट्ट बसवून घ्या.
  • रबर डीप फ्रीजमध्ये ठेवा: रबर थोडे सैल वाटल्यास १५ मिनिटे डीप फ्रीजमध्ये ठेवा. असं केल्यानं रबर कडक होतो. त्यामुळे कुकरमधून पाणी गळण्याची समस्या टाळता येईल. एका कुकरचा रबर दुसऱ्या कुकरला लावल्यास देखील रबर सैल होतो. तसंच रबर बराच काळ वापरल्यास तो सैल पडतो. त्यामुळे नियमित रबर बदलत रहा.
  • व्हिनेगर पाणी: कुकर वापरण्यापूर्वी रबर अर्धा तास व्हिनेगरच्या पाण्यात भिजत ठेवा. नंतर कुकरच्या झाकणावर रबर लावा. असं केल्यास कुकरमधून पाणी बाहेर फेकलं जाणार नाही. शिवाय, रबर देखील जास्त काळ टिकेल.
  • मंद आचेवर शिजवा: अन्न नेहमी मंद आचेवर शिजवावं. कारण गॅसची फ्लेम जास्त ठेवल्यास कुकुरमधील पाणी बाहेर फेकलं जातं.
  • कुकरचं झाकण तपासा: झाकण अनेकदा खाली पडतं. यामुळे झाकण खराब होतात. अशावेळी देखील कुकरमधून पाणी गळती होऊ लागते.
  • आणखी काही टिप्स...
  • अन्न शिजवण्यापूर्वी शिट्टी तसंच कुकरचा आतील भाग पाण्यानं स्वच्छ करा.
  • अन्न शिजवण्यापूर्वी कुकरमध्ये थोडं तेल घाला. त्यामुळे कुकरमधील खाद्यपदार्थ कुकरला चिकटलं जाणार नाही.
  • अन्न शिजवताना कुकरचं झाकण लगेच बंद करू नये. पाण्याची गळती रोखण्यासाठी, काही वेळ अन्न शिजल्यानंतर झाकण घट्ट लाऊन ठेवावा.
  • याशिवाय कुकरमध्ये जास्त पाणी घालू नये. त्यात उपलब्ध पदार्थाच्या मात्रेनुसार पाणी टाका. कारण जास्त पाणी असेल तर पाणी बाहेर फेकलं जाते. स्वयंपाक करताना या टिप्सचा अवलंब केल्यास कुकरमधून पाणी गळणार नाही, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

हेही वाचा

  1. यंदा साजरी करा अशी आगळी-वेगळी दिवाळी
  2. लाल की हिरवे कोणते सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या

Last Updated : Oct 26, 2024, 10:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.