मुंबई Virat Kohli Anushka Sharma : 29 जून रोजी बार्बाडोस येथे भारतानं आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत 17 वर्षांचा विश्वचषकाचा दुष्काळ संपवला. भारतीय क्रिकेट संघाच्या या दमदार कामगिरीबद्दल देशवासियांकडून त्यांचं कौतुक होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी असलेल्या अनुष्का शर्मानेही भारताच्या विजयावर आनंद व्यक्त करत विराटचं कौतुक केल होतं. आता विराट कोहलीनं इंस्टाग्रामवर पत्नी अनुष्का शर्मासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
- भारतानं टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी विराटनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनुष्कासोबतचा एक फोटो पोस्ट केला. तिनं पोस्टमध्ये म्हटलं की, "तुझ्याशिवाय हे काहीही शक्य झालं नसतं...माझ्या प्रिये! तू मला नेहमी नम्र ठेवतेस. हा विजय जितका माझा आहे तितकाच तुझाही आहे. मी खूप धन्य आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तसेच मी तुझा खूप आभारीही आहे."
💬💬 𝗧𝗵𝗶𝘀 𝘄𝗮𝘀 𝗺𝘆 𝗹𝗮𝘀𝘁 𝗧𝟮𝟬 𝗪𝗼𝗿𝗹𝗱 𝗖𝘂𝗽: Virat Kohli
— BCCI (@BCCI) June 29, 2024
King Kohli bids adieu to the T20I format in style and mutual admiration for Captain Rohit Sharma 👏 🫡
Take A Bow on that glorious T20I career! 🙌#T20WorldCup | #TeamIndia | #SAvIND | @imVkohli pic.twitter.com/xqur8qmHDF
अनुष्काची इंस्टाग्राम पोस्ट : भारतानं दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकल्यावर बॉलिवूड अभिनेत्री आणि विराटची पत्नी अनुष्का शर्मानंही पोस्ट शेअर करत टीम इंडियाचं कौतुक केलं. तिनं विराटसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. "टी-20 विश्वचषक सामना संपल्यानंतर माहिकानं भारताला रडताना पाहिलं. "त्यांना तिथे धीर देण्यासाठी कोण असेल?" असा प्रश्न तिनं मला विचारला. मी तिला हो डार्लिंग असं म्हणाले. भारताने मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. चॅम्पियन्स... अभिनंदन !" अशी पोस्ट अनुष्कानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे.
सामनावीरची घोषणा झाल्यानंतर विराटची निवृत्ती- अनुष्का शर्मानं आणखी एक पोस्ट शेअर केलीय. यात विराटने ट्रॉफी घेतलेला फोटो आहे. "माझं या माणसावर खूप प्रेम आहे. विराट कोहली… तू माझा आहेस हे सांगताना मला आनंद होतो. असं अभिनेत्रीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे. तिच्या या पोस्टवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात विराटनं या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलं. त्यानं 59 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 76 धावा केल्या. अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर विराटनं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली.
हेही वाचा
- विश्वविजेत्या भारतीय संघावर बक्षिसांचा वर्षाव; खेळाडू होणार मालामाल, बीसीसीआयनं केली मोठी घोषणा - Prize Money For Team India
- माझ्याकडं शब्द नाहीत, रोहितनं जगातला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं; विश्वविजयानंतर काय म्हणाले रोहितचे कोच दिनेश लाड? - Dinesh Lad Exclusive Interview
- विराट कोहली, रोहित शर्मानंतर आता 'सर'ही टी20 क्रिकेटमधून निवृत्त - Ravindra Jadeja Retirement
- 'हिटमॅन' रोहित शर्मा...! भारतीय संघाला विश्वविजेता बनवताच कर्णधार रोहितनं केले अनेक विक्रम - Rohit Sharma Records