मुंबई - Vikrant Massey-IPS Manoj Sharma: अभिनेता विक्रांत मॅसी सध्या 'ट्वेल्थ फेल'मुळे चर्चेत आहे. अलीकडेच त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक श्रेणीतील फिल्मफेअर पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं आहे. 2024 चा हा अवार्ड विक्रांत मॅसीसाठी खूप महत्वाचा होता. दरम्यान 30 जानेवारी रोजी, विक्रांतनं रियल हिरो मनोज कुमार शर्मा यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो त्याचा पुरस्कार शेअर करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्यानं या फोटोवर लिहिलं आहे, 'रियल हिरो'. या फोटोत, विक्रांत मॅसीनं आपला फिल्मफेअर पुरस्कार आयपीएस मनोज कुमार शर्मासोबत शेअर केला.
विक्रांत मॅसीची इंस्टाग्राम स्टोरी : विक्रांतनं आयपीएस मनोज कुमारला हा फोटो टॅग करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''जेव्हा एक मनोज दुसऱ्या मनोजला फिल्मफेअर ट्रॉफी दाखविण्यासाठी जातो, तेव्हा आणखी प्रेम वाढते.'' या पोस्टवर विक्रांत मॅसीनं लाल हृदय आणि डोळ्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. 'ट्वेल्थ फेल' लीड अभिनेत्री मेधा शंकर हिने देखील कमेंट सेक्शनमध्ये रेड हार्ट आणि राइजिंग हँड पोस्ट केले आहेत. 'ट्वेल्थ फेल' हा एक बायोपिक ड्रामा आहे. या चित्रपटात मनोज कुमार यांनी गरिबीवर मात करून आयपीएस अधिकारी पद गाठले याचे सुंदर चित्रण पाहायला मिळते. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित 'ट्वेल्थ फेल' चित्रपटात 'ट्वेल्थ फेल'मध्ये अभिनेत्री मेधा शंकर, संजय बिश्नोई आणि हरीश खन्ना या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
'ट्वेल्थ फेल' चित्रपटाबद्दल : 'ट्वेल्थ फेल' हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. 'ट्वेल्थ फेल' चित्रपटाची कहाणी आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या शैक्षणिक प्रवासावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये मनोज कुमार यांनी शिक्षण सोडल्यानंतर ते पुन्हा एकदा शिक्षण घेण्याचा निर्णय घेतात आणि कठीण असलेल्या युपीएससी स्पर्धा परीक्षा देतात. हा चित्रपट 20 कोटीच्या बजेटमध्ये निर्मित झाला आहे.
हेही वाचा :