ETV Bharat / entertainment

जून महिन्यात रिलीज होणार 'कल्की 2898AD' ते 'चंदू चॅम्पियन' पर्यंत हे 10 चित्रपट - Movies releasing in June - MOVIES RELEASING IN JUNE

Movies releasing in June : कॅलेंडरमधील सर्वात उष्ण महिना आज संपणार आहे. देशभर उष्णतेच्या लाटेमुळं लोक हैराण झाले आहेत. जीवाला विश्रांती आणि वातावरणात थंडावा निर्माण करण्यासाठी आम्ही जूनमध्ये रिलीज होणाऱ्या मनोरंजक चित्रपटांची यादीच तुम्हाला देत आहोत.

Films releasing in June
जूनमध्ये रिलीज होणारे चित्रपट (Kalki and Chandu Champion film poster)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 31, 2024, 5:10 PM IST

मुंबई - Movies releasing in June : 2024 सालातला सहावा महिना जून सुरू होत आहे. देशभर निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेमुळं लोक त्रस्त झालेले असताना मान्सूनचं आगमन केरळमध्ये झाल्याची सुखद बातमी आहे. देशभर मान्सून बरोबरच मनोरंजनाचा थंड शिडकावा जूनमध्ये होणार आहे. जून महिन्यात रिलीज होणाऱ्या टॉप दहा चित्रपटाबद्दल आपण इथं बोलणार आहोत. आतापासूनचा या चित्रपटांच्या तारखा नोंद करुन ठेवा.

7 जून रोजी प्रदर्शित होणारे चित्रपट

7 जून हा सिनेमाचा पहिला आठवडा आहे. या दिवशी तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या', ड्रामा चित्रपट 'फूली' आणि 'हमारी १२' चित्रपटगृहात येणार आहेत.

  • मुंज्या (हॉरर कॉमेडी) 7 जून
  • फूली (ड्रामा) 7 जून
  • हमारे 12 (ड्रामा) 7 जून

14 जून रोजी मोठा चित्रपट प्रदर्शित होत आहे

जूनचा दुसरा सर्वात मोठा चित्रपट म्हणजे 'चंदू चॅम्पियन'. हा एक स्पोर्ट्स चरित्र चित्रपट आहे ज्यामध्ये कार्तिक आर्यन भारताच्या पहिल्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मुरलीकांत पेटकरची कथा सादर करणार आहे. कार्तिकचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचवेळी, आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा 'महाराज' हा डेब्यू चित्रपट देखील 14 जून रोजी प्रदर्शित होऊ शकतो, असे बोललं जात आहे.

  • चंदू चॅम्पियन (स्पोर्ट्स बायोग्राफी) 14 जून
  • महाराज (क्राइम बायोग्राफी) 14 जून

जून मध्ये प्रदर्शित होणारा रोमँटिक चित्रपट

'इश्क विश्क रिबाउंड' हा जूनमधील एकमेव रोमँटिक चित्रपट आहे. 21 जून रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये पोहोचत आहे. जिब्रान खान, रोहित सराफ आणि हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन 'इश्क-इश्क प्यार-व्यार' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहेत.

  • इश्क विश्क रिबाउंड (रोमँटिक कॉमेडी) २१ जून

तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारा जून महिना

'कल्की 2898 एडी' हा 2024 मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. साऊथ सुपरस्टार प्रभास, मेगास्टार अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, साऊथ सुपरस्टार कमल हासन आणि दिशा पटानी स्टारर चित्रपट कल्की 2898 एडी अनेक वेळा पुढे ढकलल्यानंतर आता 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महाभारत काळापासून 2898 सालापर्यंतचा प्रवास दाखवणार आहे.

  • कल्कि २८९८ (२७ जून)

अगदी जूनच्या शेवटी मजा

जूनच्या शेवटच्या दिवसांत कुकी (सोशल ड्रामा) आणि ब्लॅक आउट (कॉमेडी थ्रिलर) हे दोन मनोरंजक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे दोन्ही चित्रपट २८ जूनलाच प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये एक खास ब्लॅकआउट आहे, ज्यामध्ये विक्रांत मॅसीचे चमकदार काम पाहायला मिळणार आहे.

  • कुकी (सोशल ड्रामा) 28 जून
  • ब्लॅकआउट (कॉमेडी थ्रिलर) 28 जून (जिओ सिनेमा)

हेही वाचा -

  1. संत मुक्ताबाईंचं प्रेरणादायी चरित्र 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ २ ऑगस्टला येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Sant Dnyaneshwaranchi Muktai
  2. 'चंदू चॅम्पियन'चे ग्वाल्हेरमध्ये ढोल-ताशांच्या गजरात स्वागत, कार्तिक आर्यनच्या गावात होणार ट्रेलर लॉन्च - Chandu Champion and Kartik Aaryan
  3. 'कोटा फॅक्टरी' सीझन 3 च्या रिलीजची तारीख क्रॅक करण्यासाठी जितेंद्र कुमारनं घातलं चाहत्यांना कोडं - Kota Factory

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.