ETV Bharat / entertainment

'इंडियन 2' मधून परतलेल्या सेनापतीचं नेटिझन्सकडून जोरदार स्वागत, ट्रेलरनं देशभर निर्माण केली हवा - Indian 2 Trailer - INDIAN 2 TRAILER

Indian 2 Trailer : कमल हसनच्या 'इंडियन 2' चा ट्रेलर 25 जून रोजी रिलीज झाला आणि नेटिझन्सच्या आनंदाला भरती आली. शंकर दिग्दर्शित हा चित्रपट पुन्हा एकदा एका दमदार कलाकारासह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रेक्षकांना ट्रेलर आवडल्याचं प्रतिक्रियावरुन दिसत आहे.

Indian 2 Trailer
'इंडियन 2' ' (Indian 2 poster)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 9:48 AM IST

मुंबई - Indian 2 Trailer : कमल हसनच्या 'इंडियन 2' चा बहुप्रतीक्षित ट्रेलर 25 जून रोजी संध्याकाळी रिलीज झाला. हा चित्रपट शंकर दिग्दर्शित 1996 मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर 'इंडियन'चा सिक्वेल आहे. ट्रेलरची सुरुवात देशातील वाढती बेरोजगारी, बोकाळलेल्या भ्रष्टाचाराबाबत लोकांमध्ये चिंता पसरवण्याच्या दृश्याने होते. कमल हासन 28 वर्षांनी पुन्हा एकदा या चित्रपटातून एक जागरुक स्वातंत्र्यसैनिक आणि सेनापती म्हणून आपल्या भूमिकेत परतल्याचं पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट जुलैमध्ये प्रदर्शित होत आहे.

'इंडियन 2' चित्रपटाचा ट्रेलर पाहून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा महापूर आला आहे. नेटिझन्सनी कमल हासनच्या सेनापतीचं स्वागत केलं आहे. "कमल हासन अधिक एस शंकर यांची ब्लॉकबस्टर मुव्ही", असं एकानं वर्णन केलंय. "विक्रम नंतर आता भारताची घटना हिंदुस्थानी वाचवणार", अशी एका प्रेक्षकाची प्रतिक्रिया आहे. "1996 मध्ये रिलीज झालेला हिंदुस्थानी किंवा इंडियनची आठवण झाली. त्याचा दुसरा भाग पाहणं हे खरंच नॉस्टेल्जिक आहे", असं एकानं म्हटलंय.

28 वर्षांनी सेनापतीच्या भूमिकेत परतला कमल हासन

कमल हसन स्टारर 'इंडियन 2' चा ट्रेलर मंगळवारी संध्याकाळी रिलीज झाला. शंकर दिग्दर्शित, हा चित्रपट 1996 मध्ये आलेल्या 'इंडियन' चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट हिंदुस्थानी या नावानंही हिंदीत प्रदर्शित झाला होता आणि यामध्ये कमल हासननं व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या सेनापती नावाच्या स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारली होती. कमल या भूमिकेत अप्रतिम दिसत आहे.

अनेक व्यत्ययानंतर 'इंडियन 2' चं पार पडलं चित्रीकरण

'इंडियन 2' ची घोषणा पहिल्यांदा कमलने 2017 मध्ये बिग बॉस तमिळच्या फिनालेदरम्यान केली होती. पण निर्माते दिल राजूने माघार घेतल्यानंतर हा चित्रपट लायका प्रॉडक्शननं ताब्यात घेतला. अखेर 2019 मध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली पण 2020 मध्ये सेटवर एक अपघात झाला, ज्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आणि चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आलं. फेब्रुवारी 2020 मध्ये सेटवर क्रेन कोसळल्यानं तीन लोकांचा मृत्यू झाला आणि 10 जण जखमी झाले होते. मृतांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक मधू, सहाय्यक दिग्दर्शक कृष्णा आणि चंद्रन नावाच्या क्रू मेंबरचा समावेश होता.

सिद्धार्थ, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, एसजे सूर्या आणि प्रिया भवानी शंकर यांसारख्या पॉवरहाऊस कलाकारांसह कमल हसन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. 'इंडियन 2' 12 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

  1. 'स्त्री 2' टीझरमध्ये श्रद्धा कपूरची धमाकेदार एन्ट्री... राजकुमार, अपारशक्तीसह पंकज त्रिपाठीची उडाली तारांबळ - Stree 2 Teaser
  2. आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना 'व्हॅम्पायर्स ऑफ विजयनगर'साठी येणार एकत्र - VAMPIRES OF VIJAY NAGAR
  3. जयदीप अहलावतनं केला जदुनाथ 'महाराज'च्या जोरदार तयारीचा खुलासा - Maharaj Jaideep Ahlawat

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.