ETV Bharat / entertainment

'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी 'बरीड ट्रुथ' वेब सीरीजचं पहिलं पोस्टर रिलीज - इंद्राणी मुखर्जी स्टोरी

'The Indrani Mukherjea Story Buried Truth' : शीना बोरा हत्याकांड हे प्रचंड गाजलं होतं. या हत्याकांडवर 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी 'बरीड ट्रुथ' ही वेब सीरीज तयार करण्यात आली आहे. निर्मात्यांनी या वेब सीरीजमधील पहिलं पोस्टर रिलीज केलंय.

The Indrani Mukherjea Story Buried Truth
द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रुथ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2024, 3:42 PM IST

मुंबई - 'The Indrani Mukherjea Story Buried Truth' : शीना बोरा हत्याकांडावर आधारित 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी 'बरीड ट्रुथ' या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर आज 29 जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात आलं आहे. शीना बोरा हत्याकांड हे देशातील प्रसिद्ध खून प्रकरणांपैकी एक आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी - 'बरीड ट्रुथ'चं पोस्टर आता झळकताना दिसत आहे. ही वेब सीरीज चार भागांत असणार आहे. 2015 मध्ये झालेल्या शीना बोरा हत्याकांड हा खूप भितीदायक होतं. याप्रकरणी अनेक युक्तीवाद मांडण्यात आले होते.

काय आहे शीना बोरा हत्या प्रकरण? : इंद्राणी मुखर्जी आयएनएक्सची सीईओ होती. 24 वर्षीय शीना बोराचीची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. शीनाची आई इंद्राणी मुखर्जीने हा कट रचला होता. शीनाचा सावत्र वडील पीटर मुखर्जी यांच्यावर हत्या आणि कट रचल्याचा आरोप याआधी करण्यात आला होता. याप्रकरणी इंद्राणी मुखर्जी तिचा ड्रायव्हर श्याम आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नाला अटक करण्यात आली होती. 20 मे 2022 रोजी 2 लाख रुपये दिल्यानंतर मुक्त झालेल्या इंद्राणीनं दावा केला की तिची मुलगी जिवंत आहे आणि ती तिचा शोध घेईल. इंद्राणी मुंबईच्या भायखळा महिला कारागृहात 6 वर्षे 9 महिने राहिली होती.

शीना बोरा हत्याकांडावर वेब सीरीज : इंद्राणीनं आपली मुलगी जिवंत असल्याचा दावा अनेकदा केला आहे. दरम्यान, इंद्राणीला विचारण्यात आलं की, ती जिवंत असताना तिनं आपल्या मुलीशी संपर्क का केला नाही, यावर इंद्राणीनं सांगितलं की, ''माझ्याकडे याचे उत्तर नाही, मी माझ्या मुलीचा शोध घेत आहे, माझ्या मुलीचा मृत्यू झालेला नाही आणि माझा यावर विश्वास बसत नाही. माझी मुलगी जिवंत आणि सुरक्षित आहे.'' इंद्राणीवर एप्रिल 2012मध्ये शीना बोराचीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. ही घटना मुंबईबाहेर झाली आहे. शीना बोराची हत्या करण्यासाठी इंद्राणीनं पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हरची मदत घेतली होती. शीनाचा अर्धा जळालेला मृतदेह 2015 मध्ये मुंबईजवळच्या जंगलात सापडला होता.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस 17' शोच्या फिनालेनंर मन्नारा चोप्रानं मानले बहिण प्रियांका चोप्राचे आभार
  2. 'बिग बॉस सीझन 17' चा विजेता ठरला मुनव्वर फारुकी! काय मिळालं बक्षीस?
  3. कार्तिक आर्यनशी हात मिळवण्याच्या नादात फॅन्सचा बॅरिकेड कोसळला, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.