ETV Bharat / entertainment

सुशांत सिंह राजपूतचा आज चौथा स्मृतिदिन; बहिणीनं पोस्ट करत केली 'ही' विनंती - Sushant Singh Rajput - SUSHANT SINGH RAJPUT

Sushant Singh Rajput Death Anniversary : सुशांत सिंह राजपूतच्या स्मृतीदिनानिमित्त चाहते भावुक झाले आहेत. लोकांना त्याच्या अभिनयाचे आणि लूकचे वेड होते. सुशांतच्या स्मृतिदिनानिमित्त जाणून घेऊ त्याच्याशी संबंधित काही गोष्टी. त्याची बहीण श्वेता सिंहनं सोशल मीडियावर पोस्ट केली.

Sushant Singh Rajput Death Anniversary
Sushant Singh Rajput Death Anniversary (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 12:45 PM IST

Updated : Jun 14, 2024, 2:19 PM IST

Sushant Singh Rajput Death Anniversary : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज चौथा स्मृतिदिन आहे. कारकीर्द यशाच्या शिखरावर असतानाच सुशांत सिंह राजपूतनं या जगाचा निरोप घेतला होता. सुशांतनं आपल्या मेहनतीन फार कमी काळात चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केलीय. आपल्या अभिनयाच्या जोरावर सुशांतनं चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केलं होतं. आज सुशांतच्या स्मृतिदिनानिमित्त जाणून घ्या त्याच्याशी संबंधित काही गोष्टी.

टीव्हीवरून अभिनय आणि फिल्मी करिअरला सुरुवात : सुशांतनं आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन मालिकांमधून केली. 2008 मध्ये स्टार प्लसचा रोमँटिक ड्रामा 'किस देश में है मेरा दिल' हा त्याचा पहिला शो होता. त्यानंतर त्याला झी टीव्हीच्या लोकप्रिय शो 'पवित्र रिश्ता'नं प्रसिद्धी मिळाली. 2013 मध्ये आलेल्या 'काय पो चे' या सिनेमातून त्यानं आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यानं 'शुद्ध देसी रोमान्स', 'पीके', 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी'मध्ये काम केलं. 2016 चा चित्रपट 'एम. एस. 'धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मध्ये त्यानं महेंद्रसिंग धोनीची मुख्य भूमिका साकारली. ही भूमिका सर्वांनाच आवडली होती.

सुशांतच्या बहीणीची पोस्ट : सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तीनं दिवंगत अभिनेत्याच्या स्मृतिदिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. शुक्रवारी सकाळी श्वेतानं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर व्हिडिओ पोस्ट केलाय. या जुन्या व्हिडिओमध्ये सुशांतसिंह आपल्या बहिणींसोबत वेळ घालवताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये तिनं भावनिक नोट लिहून भावासाठी न्याय मागितलाय. श्वेतानं अधिकाऱ्यांना 14 जून 2020 रोजी घडलेल्या घटनेची चौकशी करण्याची विनंती केलीय.

सुशांतचा जन्म : सुशांत सिंहच्या चेहऱ्यावर नेहमीच सुंदर हास्य असायचं. सुशांतचं टोपणनाव हे 'गुलशन' होतं. त्याचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी पाटणा येथे झाला. पाच भावंडांमध्ये सुशांत सर्वात लहान होता. सुशांतच्या आईच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब पाटण्याहून दिल्लीला स्थलांतरित झालं. सुशांतच्या आईचं बालपणीचं निधन झालं होतं. त्यामुळं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ त्याच्या वडिलांनीच केला. सुशांत त्याच्या कुटुंबाती सर्वात लहान होता. त्याला एकूण चार बहिणी आहेत.

आजही उलगडलं नाहीयं मृत्यूचं रहस्य : सुशांत सिंह राजपूतचे वयाच्या 34 व्या वर्षी 14 जून 2020 रोजी निधन झालं. सुशांतचा मृतदेह मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटमध्ये सापडला होता. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचं सांगितलं होतं. पण सुशांतच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, त्याची हत्या करण्यात आलंय. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. चाहत्यांकडून आणि कुटुंबीयांकडून त्याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशीची मागणी असताना सरकारनं हे प्रकरण सीबीआयकडं सोपवलं. सीबीआय अजूनही तपास करत असतानाच प्रकरण एनसीबीकडं वळलं. यानंतर पुराव्याच्या आधारे एनसीबीनं अनेक सेलिब्रिटींची चौकशी केली. सुशांतच्या प्रकरणात शेवटी काय घडलं हे अजूनही रहस्यच आहे. सुशांतचं कुटुंब आणि चाहते अजूनही न्यायाची मागणी करत आहेत.

हेही वाचा

  1. केतकी चितळेची महायुती सरकारवर आगपाखड; वक्फ बोर्डाच्या मदतीवर आक्षेप - Ketaki Chitale aggressive video
  2. करण जोहरला दिलासा; 'शादी के डायरेक्टर करण और जोहर' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती - Karan Johar
  3. 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांवर आर्ट वर्क चोरल्याचा आरोप, हॉलिवूड कलाकार संग चोईनं केला दावा - KALKI 2898 AD SUNG CHOI

Last Updated : Jun 14, 2024, 2:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.