ETV Bharat / entertainment

सुनील शेट्टी लवकरच एका थ्रिलर चित्रपटात अ‍ॅक्शन करताना दिसेल, दमदार लूक झाला व्हायरल - Sunil Shetty - SUNIL SHETTY

Suniel Shetty : सुनील शेट्टी लवकरच एका थ्रिलर चित्रपटामध्ये अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. त्यानं सोशल मीडियावर सुंदर लूक शेअर केला आहे.

Suniel Shetty
सुनील शेट्टी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 11:08 AM IST

मुंबई Suniel Shetty : अभिनेता सुनील शेट्टी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहतो. कधी आपल्या लूकनं तर कधी तो आपल्या फिटनेसनं चाहत्यांची मनं जिंकत असतो. वयाच्या 62 व्या वर्षीही सुनील शेट्टी हा खूप फिट आहे. दरम्यान बऱ्याच दिवसांनंतर सुनील शेट्टी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ॲक्शन हिरोच्या रुपात परतणार आहे. त्यानं याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. याशिवाय त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करताना सुनीलनं त्याचा फर्स्ट लुकही शेअर केला आहे. त्याचा हा लूक खूप दमदार आहे.

अ‍ॅक्शनमोडमध्ये दिसणार सुनील शेट्टी : सुनील शेट्टीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तो बर्फाळ टेकड्यांमध्ये पांढरा विंटर सूटमध्ये दिसत आहे. आजूबाजूला मोठमोठे पर्वत बर्फानं झाकलेले दिसतात. सुनील हा बर्फात बसलेला आणि काळा चष्मा घालून दिसत आहेत. या लूकमध्ये सुनील शेट्टी खूपच डॅशिंग दिसत आहे. आता वयाच्या 62 व्या वर्षीही त्याचा फिटनेस पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा फोटो शेअर करताना सुनील शेट्टीनं कॅप्शनमध्ये लिहिले, "लायन्सगेट इंडियाबरोबरच्या एका रोमांचक आगामी प्रोजेक्टमधील माझा पहिला लूक. 'अ‍ॅक्शन' मध्ये परत येण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही." आता सुनीलची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सुनील शेट्टीबद्दल : याशिवाय सुनील इतर अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सचा भाग देखील आहे. 'हेरा फेरी' फ्रँचायझीमध्ये तो अक्षय कुमार आणि परेश रावलबरोबर पुन्हा एकदा धमाल करताना दिसणार आहे. याशिवाय तो 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटात त्याच्याबरोबर रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, अक्षय कुमार, संजय दत्त, अर्शद वारसी, परेश रावल आणि तुषार कपूर यांसारखे कलाकार आहेत. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची आता अनेकजण वाट पाहात आहेत.

हेही वाचा :

  1. टू-टाइम रिलेशनशिपमध्ये राहिल्याचं नागा चैतन्यनं केलं कबुल, व्हिडिओ व्हायरल - naga chaitanya
  2. इब्राहिम अली खाननं इंस्टाग्रामवर केलं पदार्पण, एकाच पोस्टसह झाले 5 लाख 81 हजार फॉलोअर्स - ibrahim ali khan debut on instagram
  3. कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक - Sunny and Bobby Deol

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.