ETV Bharat / entertainment

साऊथ अभिनेता नितीन स्टारर 'रॉबिनहूड'च्या टीमनं सेटवर रामोजी राव यांना वाहिली आदरांजली... - RAMOJI RAO PASSES AWAY

Ramoji Rao passes Away: साऊथ अभिनेता नितीन अभिनीत 'रॉबिनहूड'च्या टीमनं चित्रपटाच्या सेटवर दिग्गज रामोजी राव गुरू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. रामोजी राव यांचे शनिवारी सकाळी हैदराबादच्या रुग्णालयात निधन झाले.

Ramoji Rao passes Away
रामोजी राव यांच निधन (साउथ अभिनेता नितीन-रामोजी राव (फाइल फोटो) (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 1:41 PM IST

Updated : Jun 9, 2024, 5:23 PM IST

मुंबई - RAMOJI RAO PASSED AWAY : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी निधन झाले. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना 5 जून रोजी हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्टार रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 87 वर्षांचे होते. त्याच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी शोक व्यक्त केला होता. तसेच चित्रपटसृष्टीतील निर्माता चेरुकुरी यांनी रामोजी राव यांना श्रद्धांजली वाहिली. रामोजी राव यांच्या निधनानं संपूर्ण साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 'रॉबिनहूड' टीमनं दिग्गज रामोजी राव गारू यांना सेटवर श्रद्धांजली वाहिली आहे.

'रॉबिनहूड'च्या सेटवर वाहिली श्रद्धांजली : शनिवारी रात्री उशिरा 'रॉबिन हूड'च्या टीमनं दिग्गज रामोजी राव यांना सेटवर आदरांजली वाहिली. चित्रपट निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, "टीम 'रॉबिनहूड'च्या सेटवर दिग्गज रामोजी राव यांना श्रद्धांजली वाहिली. चित्रपट, मीडिया आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या महान योगदानाचं टीमनं स्मरण केलं. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो." व्हायरल व्हिडिओमध्ये तेलुगू अभिनेता नितीन आणि इतर टीम रामोजी राव यांच्या फोटोसमोर प्रार्थना करताना दिसत आहेत. सर्वांनी त्यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्वांनी प्रार्थना केली आहे.

रामोजी राव गारू यांचे निधन : नितीन आणि दिग्दर्शक वेंकी कुदुमुला यांचा आगामी ॲक्शनपॅक्ड चित्रपट 'रॉबिन हूड' पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. रामोजी राव यांचं 8 जून रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाल्यानंतर त्यांना रामोजी फिल्म सिटीत आणण्यात आलं. त्यानंतर आज सकाळी 11.38 मिनिटांनी त्यांच्यावर रामोजी फिल्म सिटीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी चित्रपटसृष्टीतील नामांकित व्यक्ती आणि राजकारणीदेखील हजर होते. रामोजी राव यांच्या निधनामुळं राजकारणापासून मनोरंजनापर्यंत जगताला धक्का बसला आहे.

हेही वाचा :

  1. फिल्मी दुनियेत रामोजी रावांचाच दबदबा; 'ईटीव्ही मराठी'च्या माध्यमातून दिल्या सुपरहिट मालिका - Ramoji Rao passed away
  2. 'मी अभिनेता होणे ही रामोजी रावांचीच कृपा', रितेश देशमुखचं विधान, तर "मार्गदर्शक गुरू हरपले" रजनीकांतचं ट्विट - Ramoji Rao Passes Away
  3. न्यूयॉर्कमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा मुलगी वामिकाबरोबरचा व्हिडिओ व्हायरल - Anushka Sharma and Virat Kohli

Last Updated : Jun 9, 2024, 5:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.