ETV Bharat / entertainment

सोनू सूदच्या पाया पडली महिला चाहती, फोटो व्हायरल - Sonu Sood - SONU SOOD

Sonu sood : सोनू सूदच्या अनेक चाहत्यांनी आज सकाळी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. यामधील एक महिला चाहती त्याच्या पाया पडली. आता त्याचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत.

Sonu sood
सोनू सूद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 2:20 PM IST

मुंबई - Sonu sood : एक उत्कृष्ट अभिनेता असण्याबरोबरच, सोनू सूद त्याच्या मोठ्या मनामुळे चर्चेत असतो. तो अनेकदा गरजूंना मदत करताना दिसतो. त्याला अनेकजण गरिबांचा मसिहा देखील म्हणतात. त्यामुळेच त्याची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. नुकतेच सोनू सूदच्या घराबाहेरचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये काही चाहते त्याच्या घराबाहेर दिसत आहेत. सोनू हा चाहत्यांना भेटण्यासाठी बाहेर येताच, एक महिला चाहती त्याच्याकडे येते आणि त्याच्या पाया पडते. यानंतर, तो त्या महिलेला उचलतो आणि तिच्याबरोबर संवाद साधतो. तो स्वतः जमिनीवर बसून महिलेशी बोलतांना आणि तिच्या वेदना ऐकतो.

सोनू सूदच्या पाया पडली महिला : फोटोवरून असं वाटत आहे की, ती सोनूला मदतीसाठी विनंती करत आहे. फोटोत सोनूचे हावभाव देखील खूप गंभीर असल्याचं दिसत आहेत. आता अनेकजण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोवर कमेंट्स करत आहेत. या फोटोवर एका चाहत्यानं लिहिलं, "सोनू सूद हा अनेकांची मदत करतो. त्यानं कोविडमध्ये जे काम केलं आहे, ते कधीच कोणी विसरू शकणार नाही." दुसऱ्या एका चाहत्यांनं लिहिलं, "अंबानीकडे खूप पैसा आहे, पण सोनू इतकी रिस्पेक्ट नाही." आणखी एकानं लिहिलं," सोनू सूद हा बॉलिवूडचा रिअल हिरो आहे." याशिवाय काहीजण या फोटोच्या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.

वर्कफ्रंट : सोनू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं अनेक जाहिरातींमध्ये काम केलयानंतर 1999मध्ये तमिळ चित्रपट 'कल्लाझागर'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये तो सहायक भूमिकेत झळकला. त्यानं हिंदी चित्रपटसृष्टीत 'शहीद-ए-आझम'द्वारे पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तो भगत सिंगच्या भूमिकेत दिसला होता. आता तो जॅकलिन फर्नांडिसबरोबर ॲक्शन-पॅक्ड थ्रिलर 'फतेह'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सोनू सूदनं केलंय. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. आता सोनूचे चाहते या चित्रपटाची वाट आतुरतेनं पाहात आहेत.

हेही वाचा :

  1. 'देवरा - भाग 1' च्या अंतिम शूटसाठी ज्युनियर एनटीआर सज्ज, पाहा कधी आहे शूटिंग - Jr NTR
  2. रजनीकांत आणि नागार्जुन एकाच चित्रपटात झळकणार? 'थलायवर 171'च्या शीर्षक लॉन्चपूर्वी चर्चेला उधाण - Thalavar 171
  3. बाफ्टा आणि ऑस्करनंतर 'ओपेनहाइमर' फेम स्टार सिलियन मर्फीला मिळाला आणखी एक मानाचा पुरस्कार - Cillian Murphy

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.