ETV Bharat / entertainment

अजय देवगण आणि मृणाल ठाकूर स्टारर 'सन ऑफ सरदार 2'मध्ये दिसणार 11 मोठे कलाकार - Ajay Devgan and Mrunal Thakur - AJAY DEVGAN AND MRUNAL THAKUR

Son Of Sardaar 2 Starcast : अजय देवगणच्या फॅमिली ड्रामा कॉमेडी चित्रपट 'सन ऑफ सरदार 2'च्या स्टार कास्टची नावे समोर आली आहेत. या चित्रपटामध्ये आता कोणते कलाकार दिसणार याबद्दल जाणून घ्या...

Son Of Sardaar 2 Starcast
सन ऑफ सरदार 2 स्टार कास्ट (सन ऑफ सरदार 2 (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 3:21 PM IST

मुंबई Son Of Sardaar 2 Starcast : अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा आपल्या कॉमेडीनं प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. अजय हा 2012 मध्ये आलेल्या 'सन ऑफ सरदार' या कॉमेडी ड्रामा चित्रपटाच्या सीक्वेलमुळे सध्या चर्चेत आहे. सन ऑफ सरदारचा सीक्वेल 12 वर्षांनंतर येत आहे. त्यामुळे अजय देवगणचे चाहते खूप खुश आहेत. 'सन ऑफ सरदार'मध्ये सोनाक्षी सिन्हाबरोबर अजय रोमान्स करताना दिसला होता. आता 'सन ऑफ सरदार 2'मध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूर अजयबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. दरम्यान 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटातील इतर स्टारकास्टचीही नावे समोर आली आहेत.

'सन ऑफ सरदार 2'ची स्टार कास्ट : 'सन ऑफ सरदार 2'मध्ये प्रेक्षकांना खूप हसायला मिळणार आहे, कारण यावेळी तीन-चार नव्हे तर 11 कलाकार आपल्या कॉमेडीनं प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहेत. 'सन ऑफ सरदार 2'मध्ये अजय, देवगण, मृणाल ठाकूर आणि संजय दत्त व्यतिरिक्त, विजय राज, दीपक डोबरियाल, कुब्बरा सैत, विंदू दारा सिंग, मुकुल देव, शरत सक्सेना, रोशनी अहलुवालिया, रवी किशन, नीरू बाजवा, अश्विनी काळसेकर आणि चंकी पांडे हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचं शूटिंग मुंबई आणि भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्ये होईल. 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाच्या रिलीजची घोषणा अद्याप करण्यात आली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट 2025च्या अखेरीस बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊ शकतो.

वर्कफ्रंट : आता 2012 मध्ये आलेल्या 'सन ऑफ सरदार'बद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. याशिवाय या चित्रपटामधील गाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. दरम्यान अजय देवगणच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर त्याचा रुपेरी पडद्यावर 2 ऑगस्ट रोजी 'औरों में कहाँ दम था' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष जादू करू शकलेला नाही. दरम्यान त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'सिंघम अगेन', 'रेड 2', 'दे दे प्यार दे 2', 'टोटल धमाल' आणि 'गोलमाल 5' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. अजय देवगण स्टारर 'सन ऑफ सरदार 2'मध्ये सोनाक्षी सिन्हाच्या जागी दिसणार 'ही' अभिनेत्री... - mrunal thakur

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.