ETV Bharat / entertainment

वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' चित्रपटाचं शूटिंग सुरू - Sunny Sanskari Ki Tulsi Kumari - SUNNY SANSKARI KI TULSI KUMARI

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari : वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर आगामी 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या चित्रपटाचे शूटिंग सुरू झालं आहे. शशांक खेतान या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. त्यांनीच सोशल मीडियावर शूटिंग सुरू झाल्याची घोषणा केली आहे.

Varun Dahwan and Janhvi Kapoor
वरुण धवन आणि जान्हवी कपूर (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari shoot begins (Photo: IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 7:53 PM IST

मुंबई - Sunny Sanskari Ki Tulsi Kumari : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा नवीन चित्रपट 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या चित्रपटाच्या शूटिंगला आज शनिवारी सुरुवात झाली. शूटिंग सुरू झाल्याची घोषणा करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी सोशल मीडियावर पहिल्या शॉटचा एक फोटो शेअर केला आहे.

Varun Dahwan and Janhvi Kapoor
'सनी संस्कार की तुलसी कुमारी' चित्रपटाचं शूटिंग सुरू (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari shoot begins (Photo: IANS))

'धडक' आणि 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे शशांक खेतान दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट निर्माता करण जोहरने सादर केला आहे.शशांकने त्याच्या नवीन चित्रपटावर काम सुरू केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंस्टाग्राम स्टोरीजवर शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा एक फोटो पोस्ट केला आहे.

जान्हवी आणि वरुण व्यतिरिक्त या चित्रपटात सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफ यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाबाबतची अधिक माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

हा चित्रपट 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' नंतर वरुणचा शशांक खेतानबरोबरचा हा तिसरा चित्रपट आहे. तर 'धडक' चित्रपटात पदार्पण केल्यानंतर जान्हवीचा दिग्दर्शक खेतान बरोबरचा हा दुसरा चित्रपट आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित त्यांच्या रोमँटिक बवाल चित्रपटानंतर वरुण आणि जान्हवी पुन्हा एकत्र काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. 'बवाल' चित्रपटाची कथा खूप रंजक होती आणि प्रेक्षकांनी दोघांच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं होतं.

वरुण धवनच्या वर्कफ्रंटचा विचार करता तो आणि सामंथा रुथ प्रभू 'सिटाडेल: हनी बनी' या अ‍ॅक्शन-पॅक थ्रिलरमध्ये एकत्र काम करणार आहेत. राज आणि डीके यांनी दिग्दर्शित केलेली आणि के के मेनन आणि साकिब सलीम यांच्यासह प्रतिभावान कलाकारांचा समावेश असलेली ही मालिका 'सिटाडेल' या लोकप्रिय अमेरिकन शोचे भारतीय रूपांतर आहे.

दुसरीकडे, जान्हवी कपूर या वर्षी साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्ट 1' मधून टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय ती साऊथ स्टार राम चरणच्या 'आरसी16' या चित्रपटातही दिसणार आहे. 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. करण जोहरच्या या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. 'मिस्टर अँड मिसेस माही' आता 31 मे रोजी रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

रणबीर-आलिया प्रिय मुलगी राहाबरोबर झाले स्पॉट, राहाच्या हसण्याची चाहत्यांना भुरळ - Ranbir Alia spotted with Raha

आलिया भट्टचा शॉर्ट्समधील व्हिडिओ झाला व्हायरल, चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया - Alia Bhatt Summer Outfit

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.