ETV Bharat / entertainment

मुंबईत लोकसभा निवडणूकीचं मतदान केल्यानंतर संजय दत्त काय म्हणाला, पाहा व्हिडिओ - Lok Sabha election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदान केल्यानंतर संजय दत्तनं जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं. त्याचे वडील सुनिल दत्त आणि बहिण प्रिया दत्त राजकारणात खासदार म्हणून काम करत होते. संजय दत्त मात्र यापासून अलिप्त आहे. मला चित्रपटात काम करायचं, चांगले चित्रपट बनवायचे आहेत, मला नेता व्हायचं नाही, असं तो मतदानानंतर म्हणाला.

Sanjay Dutt
संजय दत्त (PTI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 5:28 PM IST

मुंबई - Lok Sabha election 2024 : बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्तने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केलं आहे. देशात आज 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होत असून, मुंबईत आज सकाळपासून मतदान सुरू आहे. इकडे वांद्रे पश्चिम येथील पाली हिल भागात असलेल्या मतदान केंद्रावर संजय दत्त मतदान करण्यासाठी आला होता. या नंतर बॉलिवूमध्ये बाबा नावानं ओळखला जाणाऱ्या संजय दत्तनं सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं.

मतदान केल्यानंतर संजय दत्त काय म्हणाला?

संजय दत्त पांढऱ्या आणि हिरव्या प्रिंटेड शर्टमध्ये मतदान करण्यासाठी आला होता. मतदान केल्यानंतर संजय दत्तला त्याने कोणत्या आधारावर मतदान केलं असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा याला उत्तर देताना अभिनेता संजूबाबा म्हणाला, "मी लोकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन करु शकतो. मी राजकारणी नाही, मी फक्त देशाच्या भल्यासाठी मतदान करण्यासाठी आलो आहे. मला काम करायचंय, चांगले चित्रपट बनवायचे आहेत...बस."

संजय दत्तचे दिवंगत वडील आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता सुनील दत्त आणि त्याची बहिण प्रिया दत्त हे एकेकाळी खासदार होते, पण संजय दत्तने कधीही राजकारणात प्रवेश करण्याची आपली इच्छा व्यक्त केली नाही किंवा निवडणूकही लढवली नाही. संजय दत्त असं मानतो की तो सामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगतो आहे आणि चित्रपटांमध्ये काम करून त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करतो.

संजय दत्त शेवटचा साऊथ सुपरस्टार विजयच्या 'लिओ' चित्रपटात दिसला होता. 'लिओ' या चित्रपटाने जगभरात चांगला व्यवसाय केला. त्याचबरोबर आता संजय दत्त दाक्षिणात्य अभिनेता राम पोथीनेनीच्या ‘आय स्मार्ट’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा -

"मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हावी", परेश रावलची प्रतिक्रिया: दिग्गज सेलेब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क - LOK SABHA ELECTION 2024

'अभी तो वोटिंग शुरू हुई है', म्हणत अमिताभ बच्चननं मतदानासाठी केलं अनोख्या स्टाईलमध्ये आवाहन - LOK SABHA ELECTION 2024

जान्हवी, फरहान, राजकुमार रावसह बॉलिवूड सेलेब्रिटींनी मुंबईत केलं मतदान - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.