मुंबई - Sai Pallavi Dances on Sheila Ki Jawani: साऊथ ब्युटी साई पल्लवीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये, साई 'तीस मार खान' चित्रपटातील कतरिना कैफच्या 'शीला की जवानी' या हिट ट्रॅकवर नाचताना दिसत आहे. या ब्लॉकबस्टर गाण्यात ती कतरिनाच्या स्टेप्सवर डान्स करत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिच्या कॉलेज फेस्टमधला असून सोशल मीडियावर सध्या धमाल करत आहे. साईचा हा व्हिडिओ आता अनेकांना आवडत आहेत. व्हिडिओमध्ये साईनं खूपच अप्रतिम डान्स केला आहे.
साई पल्लवी डान्स व्हिडिओ व्हायरल : साई पल्लवीचा सोशल मीडियावर डान्स पाहून व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये एका चाहत्यानं लिहिलं की, 'साईचा डान्स अप्रतिम आहे.' दुसऱ्या एका चाहत्यांन लिहिलं, 'साईचा हा व्हिडिओ खूप जुना आहे, ज्यात ती स्पष्ट दिसत देखील नाही.' आणखी एकानं लिहिलं, 'हा व्हिडिओ खरच साईचा आहे का?' याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून साईचं कौतुक करताना दिसत आहेत.
साई 'रामायण'मध्ये सीतेच्या भूमिकेत दिसणार : साईच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायच झालं तर, ती लवकरच नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिची निवड सीतेच्या भूमिकेसाठी करण्यात आली आहे. याशिवाय 'रामायण' चित्रपटात तिच्याबरोबर बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर श्रीरामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अलीकडेच अशी बातमी समोर आली होती की, साई पल्लवी सीता माताच्या भूमिकेसाठी 6 कोटी रुपये घेत आहे, तर रणबीरनं या चित्रपटासाठी 75 कोटी रुपये फी मागितली आहे. याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 'रामायण' चित्रपटाचे शूटिंग या महिन्याच्या सुरुवातीला सुरू झाले असून साई पल्लवी लवकरच शूटिंगमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या चित्रपटाचा मुंबईत अयोध्येसारखा भव्य सेट उभारण्यात आला आहे. या सेटवरची काही फोटो काही दिवसापूर्वी लीक झाले होते. त्यामुळे आता 'रामायण' चित्रपटाच्या सेटवर नो-फोन पॉलिसी लागू केली आहे.
हेही वाचा :