हैदराबाद - Ramoji Rao : ईनाडू आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे शनिवारी 8 जून रोजी निधन झाले. रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यानं त्यांना 5 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांनी पहाटे 3.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामोजीरावांनी भारताच्या विकासाची खूप तळमळ केली होती. त्यांनी अनेक लोकांना रोजगार दिला आहे. मीडिया, चित्रपट आणि मनोरंजन उद्योगावर अमिट छाप सोडणारे रामोजी राव यांच्या मृत्यूनंतर साऊथ चित्रपटसृष्टीतील कलाकार शोक व्यक्त करत आहेत.
रामोजी राव यांचं झालं निधन : रामोजी राव हे एक यशस्वी उद्योजक, चित्रपट निर्माता आणि मीडिया सम्राट होते. त्यांना तेलुगू मीडियातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी ओळखल्या जाते. त्यांचं पूर्ण नाव चेरुकुरी रामोजी राव होते. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त रामोजी राव यांनी हैदराबादमध्ये रामोजी ग्रुपची स्थापना केली होती. या समूहात जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ, रामोजी फिल्म सिटी, ईटीव्ही नेटवर्क आणि चित्रपट निर्मिती कंपनी उषा किरण मुव्हीज यांचा समावेश आहे. त्यांच निधन झाल्यानंतरही आज रामोजी फिल्म सिटीमधील काम सुरूचं आहे.
एस.एस राजमौली यांची मागणी साऊथ चित्रपटसृष्टीतील चिरंजीवीनं एक्सवर एक पोस्ट करून रामोजी राव यांना श्रद्धांजली वाहली आहे. एस. एस. राजामौली यांनी पोस्ट करून श्रद्धांजली वाहत लिहिलं, "एका माणसानं त्याच्या 50 वर्षांच्या कठोर परिश्रमानं आणि नवकल्पनानं लाखो लोकांना रोजगार, उपजीविका आणि आशा दिली. रामोजी राव यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना 'भारतरत्न' प्रदान करणे." तसेच जूनियर एनटीआरनं श्रद्धांजली वाहत लिहिलं, "श्री रामोजी राव यांच्यासारखे लोक लाखात एक आहेत. माध्यम सम्राट आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज, त्यांची अनुपस्थिती कधीही भरून न येणारी आहे. ते आता आपल्यात नाही. ही बातमी खूप दुःखद आहे. 'निन्नू छदलानी' या चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत माझी ओळख झाली. तेव्हाच्या आठवणी मी कधीही विसरणार नाही. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करतो." याशिवाय अल्लू अर्जुन रामोजी राव यांना श्रद्धांजली वाहत लिहिलं, "रामोजी राव हे एक प्रणेते आणि एक प्रेरणादायी द्रष्टा व्यक्तिमत्व होते. मी मनापासून त्यांचा आदर करतो. त्यांच्या निधनानं खूप दुःख झालं. प्रत्येक वेळी मीडिया, सिनेमा आणि इतर अनेक उद्योगांमध्ये त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान मी कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांप्रती मनःपूर्वक संवेदना. त्यांच्या महान आत्म्याला शांती लाभो." रामोजी राव यांच्या पार्थिवाच्या अंतिमदर्शनासाठी अनेक सिनेस्टार्स हजेरी लावत आहेत.
हेही वाचा :
- कंगना रणौत वादग्रस्त विधानांमुळं असते चर्चेत; उद्धव ठाकरेंशी 'पंगा' घेणं पडलं होतं महागात, वाचा, वाद आणि कंगनाचं नातं - Kangana Ranaut Controversial Statement
- "ये पवन नहीं आँधी है" : नरेंद्र मोदींनी केलं जनसेना प्रमुख पवन कल्याणचं कौतुक - Pawan Kalyan
- अनुराग कश्यप, गुलशन देवय्या स्टारर 'बॅड कॉप'चा ट्रेलर रिलीज - Bad Cop trailer