मुंबई - अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिनं अटल सेतूवरुन प्रवास केल्यानंतर आपला अनुभव सांगणारा एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांकडून हा व्हिडिओ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारार्थ असल्याची टीका होऊ लागली. दरम्यान एएनआयनं तिची याविषयावर मुलाखत घेऊन तिची मतं जाणून घेतली. यामध्ये तिनं अटल सेतू झाल्यानं लोकांचा वाचलेला वेळ, अशा प्रकारचे सेतू उभारण्यात सुरू असलेली भारताची प्रगती यावरही भाष्य केलं.
विशेष म्हणजे रश्मिका मंदान्नाच्या अटल सेतूबद्दलच्या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माणसे जोडण्यापेक्षा समाधानकारक काहीही नाही असे त्यांनी म्हटलंय. "लोकांना जोडणे आणि जीवन चांगले बनवणे यापेक्षा समाधानकारक काहीही नाही", असं पंतप्रधानांनी लिहिलंय.
रश्मिकानं एएनआयशी बोलताना मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) अटल सेतू बद्दल सांगितले आणि सांगितले की दोन तासांचा प्रवास 20 मिनिटांत करता येतो. तुमचा यावर विश्वास बसणार नाही! असे काही शक्य होईल असे कोणाला वाटले असेल? आज नवी मुंबई ते मुंबई, गोवा ते मुंबई आणि बेंगळुरू ते मुंबई, जेव्हा सर्व प्रवास इतक्या सहजतेने आणि अशा आश्चर्यकारक पायाभूत सुविधांनी केला जातो याचा मला अभिमान वाटतो.
रश्मिकाच्या या पोस्टवर "मुख्य प्रवाहातील सेलिब्रिटीची निवडणूक हंगामातील सर्वात सरळ 'जाहिरात'?" अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अंकित मयंक नावाच्या युजरनं लिहिलंय की, "तू जर असे पैसे घेऊन व्हिडिओ बनवणार असशील तर मग एकदा लदाख, मनिपूर आणि प्रज्वल रेवण्णाच्या पीडितांचीही भेट घेशील. परंतु, तसं तू करणार नाहीस. कारण त्यासाठी तुला पैसे मिळणार नाहीत." आणखी एकानं लिहिलंय, "हॅलो ब्रेनलेस रश्मिका, या प्रोमोसाठी किती पैसे घेतलेस किंवा तुझ्या बेहिशेबी पैशाच्या प्रकरणासाठी एजन्सी थांबली आहे. भाजपसाठी अशा निरुपयोगी प्रचार जाहिराती करण्यापूर्वी पहिल्यांदा काळजीपूर्व अभ्यास कर." रश्मिका मंदान्नाच्या कर्नाटकातील विराजपेट, कोडगु येथील प्रॉपर्टीवर आयकर विभागानं छापा मारल्याची बातमी 16 जानेवारीला घडली होती. त्या बातमीला जोडून काहीजण तिच्यावर या व्हिडिओवर टीका करत आहेत.
"रश्मिका तुला लाज वाटली पाहिजे. हा अटल सेतू आमच्यासाठी मोफत आलेला नाही. प्राप्तिकर भरल्यानंतर आम्ही रु. 19 लाखांची कार, त्यात 9 लाख रुपये फक्त करात जातात, मग आम्ही पेट्रोलवर 200% कर भरतो.", असंही एकानं लिहिलंय.
असं असलं तरी अनेकजण रश्मिकाचा हा व्हिडिओ शेअर करत तिनं मांडलेल्या भूमिकेचं कौतुक करत आहेत. मोदीज फॅमिली नावानं असलेल्या अनेक युजर्सनी हा व्हिडिओ अभिमानानं शेअर करायला सुरूवात केली आहे.
हेही वाचा -