ETV Bharat / entertainment

रणवीर सिंगनं कुटुंबासहित पाहिला 'कल्की 2898 एडी', पत्नी दीपिकाकरिता शेअर केली पोस्ट - ranveer singh and deepika padukone - RANVEER SINGH AND DEEPIKA PADUKONE

Ranveer Singh and Deepika padukone : 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. हा चित्रपट आता दीपिका आणि रणवीरनं पाहिला आहे. त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Ranveer Singh and Deepika padukone
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 11:12 AM IST

मुंबई - Ranveer Singh and Deepika padukone : नाग अश्विनचा सायन्स-फिक्शन 'कल्की 2898 एडी' 27 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी यांसारखे स्टार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता दीपिका पदुकोण 'कल्की 2898 एडी' पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये पोहोचले. त्यांच्यासाठी एक स्पेशल स्क्रीनिंग होती. यावेळी रणवीर सिंगबरोबर दीपिका पदुकोणची सासू आणि वहिनीही उपस्थित असल्याचं दिसल्या.

'कल्की 2898 एडी' दीपिका आणि रणवीरनं पाहिला : 'कल्की 2898 एडी'मध्ये दीपिका आईची (सुमती) भूमिका साकारत आहे. सर्वजण तिच्या अभिनयाचे सध्या कौतुक करत आहेत. खऱ्या आयुष्यातही दीपिका लवकरच आई होणार आहे. दीपिका आणि रणवीरचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हायरल व्हिडिओमध्ये रणवीर हा दीपिकाचा हात पकडून कारच्या दिशेन जाताना दिसत आहे. यावेळी दीपिकानं पांढऱ्या ओव्हरसाईज टी-शर्टवर काळ्या पट्टीच्या ब्लेझरसह ब्लू डेनिम जीन्स परिधान केला होता. लूकला आणखी सुंदर बनविण्यासाठी दीपिकानं मोकळे केस आणि चष्मा घातला होता. दुसरीकडे रणवीर सिंगनं आपल्या स्वॅगनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काळ्या रंगाच्या पोशाखात तो खूपच डॅशिंग दिसत होता.

रणवीर सिंगनं शेअर केली पोस्ट : चित्रपट पाहिल्यानंतर रणवीर सिंगनं त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाचं कौतुक करताना लिहिलं, "कल्की 2898 AD' हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम चित्रपट आहे. नाग सर आणि टीमचे अभिनंदन! प्रभास हा उत्तम स्टार आहे. कमल हासन उलगनायगन हे कायमचे सर्वोच्च स्टार! जर तुम्ही माझ्यासारखे अमिताभ बच्चनचे चाहते असाल, तर तुम्ही हा चित्रपट चुकवू शकत नाही! माझी प्रिय दीपिका पदुकोण तू अतुलनीय आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो!' दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती पुढं 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगणबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टी करत आहे.

हेही वाचा :

  1. श्रद्धा कपूरनं लखनौमध्ये चाहत्यांना मिठी मारून घेतली भेट, सोशल मीडियावर नेटिझन्सनं केलं कौतुक - shraddha kapoor
  2. अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या आधी मुकेश, नीता अंबानी यांनी लावली 50 वंचित जोडप्यांची लग्नं - Mukesh and Nita Ambani
  3. तमन्ना भाटियानं घेतली उंच भरारी, मुंबईत 18 लाख दरमहा भाड्यानं घेतले तीन फ्लॅट... - TAMANNAAH and commercial property

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.