ETV Bharat / entertainment

अमिताभ बच्चनच्या "सिग्नेचर" रनिंग स्टाईलवर रणवीर सिंग फिदा, पाहा बच्चन यांचा दमदार व्हिडिओ - BIG B SIGNATURE RUNNING STYLE - BIG B SIGNATURE RUNNING STYLE

अमिताभ बच्चन यांना आपण 'कौन बेनगा करोडपती'च्या सेटवर जोरदार धावताना आपण पाहिलं असेल. या वयातही त्यांचं धावणं अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतं. आता 'बिग बी' यांनी धावत असतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. रणवीर सिंगनं 'बिग बी' यांच्या 'सिग्नेचर' रनिंग स्टाईलचं कौतुक केलंय.

Amitabh Bachchan and Ranveer Singh
अमिताभ बच्चन आणि रणवीर सिंग (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 4:45 PM IST

Updated : Jul 29, 2024, 5:07 PM IST

मुंबई - 'मेगास्टार' अमिताभ बच्चन वयाच्या 81 वर्ष उलटल्यानंतरही स्वतःला फिट ठेवण्यासाठी जी मेहनत घेतात, ती तरुणांनाही लाजवणारी आहे. चाहत्यांना प्रेरणा देण्याची एकही संधी ते सोडत नाहीत आणि त्याचा एक नवीन पुरावा त्यांनी पोस्ट केला आहे. 'बिग बी' यांच्या अनेक चाहत्यांप्रमाणे अभिनेता रणवीर सिंगनंही त्यांच्या या पोस्टचं कैतुक केलंय.

अमिताभ यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक रनिंग सीक्वेन्स दाखवण्यात आला आहे. ही सीक्वेन्स 1990 च्या 'अग्निपथ' चित्रपटातील महत्त्वाच्या दृश्यांपैकी एक आहे, त्यानंतर अमिताभ थेट त्यांच्या बागेत जॉगिंग करताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की - 'अग्निपथ'पासून आतापर्यंत कामासाठी धावतच आहे.

'बिग बीं'नी व्हिडिओ शेअर त्यांचे चाहते आणि फिल्म इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. रणवीर सिंगनं लिहिलं, 'द सिग्नेचर रनिंग स्टाइल!!!'आयुष्मान खुरानानं या व्हिडिओला "G.O.A.T" असं म्हटलंय. एका युजरनं लिहिलंय की, "सर, अशीच प्रेरणा देत रहा."

Comment on Amitabh Bachchan's post
अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवरील प्रतिक्रिया (ANI)

दरम्यान, अमिताभ बच्चन 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून, चाहते आणि फिल्म इंडस्ट्री सहकलाकार त्यांच्या जबरदस्त परफॉर्मन्सचं कौतुक करत आहेत. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून चित्रपटातील कलाकार आणि टीमसाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी हा चित्रपट पोस्ट-अपोकॅलिप्टिक चित्रपट हिंदू धर्मग्रंथांवर आधारित आहे आणि 2898 एडी मध्ये सेट आहे. दीपिका पदुकोण, कमल हासन, प्रभास आणि दिशा पटानी देखील या चित्रपटाचा भाग आहेत. हा चित्रपट एक पौराणिक कथेवरुन प्रेरित असलेला भव्य सायन्स फिक्शन एक्स्ट्राव्हॅगान्झा आहे. अभिनेता विजय देवरकोंडा, दुल्कर सलमान आणि मृणाल ठाकूर यांनी या चित्रपटात कॅमिओ रोल केला आहे. याशिवाय अमिताभ बच्चन 'वेट्टियाँ'च्या शूटिंगमध्ये गुंतले आहेत. या चित्रपटात रजनीकांतचीही भूमिका आहे.

रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटचा विचार करता, तो फरहान अख्तरच्या 'डॉन 3'मध्ये देखील दिसणार आहे. ऑगस्ट 2023 मध्ये फरहाननं एका खास घोषणेसह व्हिडिओमध्ये हे उघड केले होते की रणवीर सिंग हिट फ्रेंचायझीच्या तिसऱ्या चित्रपटात नवीन डॉन असेल. टीझरमध्ये रणवीर एका बिल्डिंगमध्ये कॅमेऱ्याकडे पाठ करून बसलेला दिसत आहे.

'डॉन'मध्ये शाहरुख खान, प्रियांका चोप्रा आणि बोमन इराणी प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि न्यूचेटेल इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. नंतर, त्याचा सिक्वेल 2011 मध्ये रिलीज झाला आणि तो हिट घोषित झाला होता. 'डॉन 2'मध्ये अभिनेता हृतिक रोशन स्पेशल अपिअरन्स भूमिकेत दिसला होता. फरहान दिग्दर्शित 'डॉन' हा अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असलेल्या 1978 मध्ये रिलीज झालेल्या चटित्रपटाचा रिमेक होता.

हेही वाचा -

  1. 'कौन बनेगा करोडपती'च्या 16 व्या सीझनसाठी होस्ट म्हणून 'धावत' परतले अमिताभ बच्चन - Amitabh Bachchan KBC
  2. बच्चन सदस्यांना घेऊन बनवायचा होता मुघल-ए-आझम, प्रपोजलवर अमिताभ बच्चन यांनी दिली प्रतिक्रिया - Mughal E Azam Remake
  3. 'कल्की 2898 एडी' ओटीटीवर पाहण्यासाठी चाहत्यांना सप्टेंबरपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा - kalki 2898 ad movie ott

Last Updated : Jul 29, 2024, 5:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.